Gautami Patil : महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमात वेगवेगळे प्रयोगही करण्यात येतात. बैलाच्या वाढदिवसापासून ते एखाद्या लहान मुलाच्या वाढदिवसापर्यंत गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. पण तिच्या कार्यक्रमात कुठे राडा आणि गोंधळ होतो तर कुठे तरुणांची हुल्लडबाजी. काल (19 नोव्हेंबर 2023) सर्व क्रिकेट प्रेमींच्या नजरा भारत-ऑस्ट्रेलिया (IND Vs Aus) सामन्यावर होत्या. दरम्यान गोंदियातील (Gondia) गौतमीच्या कार्यक्रमात खास मॅचचं स्ट्रीमिंग करण्यात आलं होतं. 


झाडीपट्टी म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान क्रिकेटप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह होता. शिट्ट्या, टाळ्या वाजवत ते सामन्याचा आनंद घेत होते. अगदी त्याचप्रमाणे गोंदियातील गौतमीच्या कार्यक्रमात टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत प्रेक्षकांनी जल्लोष केला. मंचावर एकीकडे गौतमी थिरकत होती तर दुसरीकडे मागे मोठ्या पडद्यावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू होता. 


झाडीपट्टीचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. झाडीपट्टीच्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील लावणी रसिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. 


गौतमी थिरकली 'राष्ट्रवादी पुन्हा' गाण्यावर


गौतमी पाटील आणि गोंधळ असं समीकरण नेहमीच पाहायला मिळतं. मात्र गोंदियातील कार्यक्रमात असा कुठलाही गोंधळ पाहायला मिळाला नाही. याबद्दल प्रतिक्रिया देत गौतमी म्हणाली,"कधीतरी गोंधळ होत असतो मात्र प्रत्येक वेळेस होत नाही आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि गोंदियात आल्यावर खूप छान वाटले". गोंदियात गौतमीने 'राष्ट्रवादी पुन्हा' या गाण्यावर डान्स केला होता. 






गौतमी पाटीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. चाहत्यांच्या हे फोटो पसंतीस उतरले असले तरी नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलच ट्रोल केलं आहे. मॅच बघ, काय फोटो टाकते, इकडे काय तुझं काय अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.


संबंधित बातम्या


Gautami Patil: "माझा कारभार सोपा नसतोय रं" नंतर आता "दिलाचं पाखरू "; गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची होतीये चर्चा!