Gudi Padwa 2024 Wishes : हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2024) सणापासून होते. यंदा 9 एप्रिल 2024 रोजी नवीन हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो, या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जातात. नवीन वर्षाची सुरुवात यशाने व्हावी, यशाची गुढी उंचच राहावी, अशी इच्छा या दिवशी व्यक्त केली जाते. या दिवशी एकमेकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. तुम्हीही घर बसल्या तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना गुढीपाडव्याचे संदेश (Gudi Padwa 2024 Wishes in marathi) पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता, त्यासाठी काही शुभेच्छा संदेश-


नववर्ष आणि गुढीपाडवा शुभेच्छा संदेश (Gudi Padwa Wishes In Marathi)


नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..
सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवासाच्या सोनेरी शुभेच्छा,
सोन्यासारख्या लोकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


नेसून साडी, माळून गजरा,
उभी राहिली गुढी नववर्षाच्या स्वागताची,
गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!


आशा-आकांक्षांचे बांधून तोरण,
समृद्धीची गुढी उभारू दारी,
गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या,
कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी.
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!


श्रीखंडपुरीची लज्जत,
गुढी उभारण्याची लगबग,
सण आहे आनंदाचा आणि सौख्याचा,
तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!


जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या,
हार्दिक शुभेच्छा!


सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात
नव्या वर्षाची सोनेरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!


राग रुसवे विसरुन वाढवा नात्यातला गोडवा
एकत्र येऊन साजरा करुयात सण गुढीपाडवा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!


पालवी चैत्राची अथांग स्नेहाची जपणूक परंपरेची,
उंच उंच जाऊ दे गुढी आदर्शाची,
संपन्नतेची, उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! 


गुढी उभारुयात नववर्षाची, नव्या आयुष्याची,
सुख-समृद्धीची, चांगल्या आरोग्याची,
 उज्ज्वल भविष्याची,
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!


नववर्ष आला, आता आपला फळांचा राजा पण येणार,
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला,
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा!


निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी
नवे नवे वर्ष आले घेऊन गुळसाखरेची गोडी
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!


गुढी मराठी संस्कृतीची,
गुढी मराठी अस्मितेची,
आपणांस व आपल्या परिवारास हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


दिवस उगवतो दिवस मावळतो,
वर्ष येतं वर्ष जातं पण
प्रेमाचे बंध कायम राहतात,
आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा,
सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


हेही वाचा:


Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा सण का साजरा करतात, कधी विचार केलाय? जाणून घ्या गुढीपाडव्याचं महत्त्व