Continues below advertisement

Horoscope Today 23 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 23 डिसेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. नुकताच पौष मासारंभ झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज घरामध्ये वाढत्या खर्चामुळे थोडे ताण निर्माण होतील, अशा वेळी कोणती प्रतिक्रिया न करता तटस्थ राहणे उत्तम

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी जपून बोला, कारण थोडा तापटपणा वाढण्याची शक्यता आहे

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमची दगदग आणि धावपळ थोडी वाढणार आहे, महिलांची दैनंदिन कामे थोडी विस्कळीत होण्याची शक्यता

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज राग ताब्यात ठेवणे महत्त्वाचे ठरेल, नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगले ग्रहमान आहे

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला हरकत नाही, कोणताही सकारात्मक दृष्टिकोन यश देऊन जाणारा आहे

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडे अडथळे येतील, आळशीपणा सोडायला लागेल

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल किंवा त्यांची मते न पटल्यामुळे संघर्ष संभवतो

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमचा मूळ गंभीर स्वभाव अजूनच गंभीर बनेल, महिलांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज वेळेचे महत्व इतरांपेक्षा तुम्हाला जास्त कळेल, त्यामुळे इतरांच्या कुचाळक्या तुम्ही कधीच करणार नाही

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना जाणून घेण्यात यशस्वी व्हाल, आत्मविश्वास थोडा डळमळीत झाल्यामुळे कोणताही निर्णय पटकन घेऊ शकणार नाही

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज व्यवसाय नोकरीमध्ये इतरांची मदत घ्यावीशी वाटेल, तरुणांच्या प्रेमप्रकरणांमध्ये गैरसमज आणि दिशाभूल होण्याची शक्यता

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो घरातील सदस्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यामध्ये यश मिळणार नाही.

हेही वाचा

Weekly Horoscope: नवा आठवडा.. 5 राशींच्या नशीबी सुखाचा उपभोग! 2025 वर्षाचं जाता जाता मोठ्ठं सरप्राईझ, दुप्पट वेगाने प्रगती, पैसा खेळता..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)