Grah Gochar In October 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेच्या अंतराने राशी परिवर्तन करतात. या राशी (Zodiac Signs) परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर होतो. काहींवर हा परिणाम शुभ तर काही राशींवर हा परिणाम अशुभ असतो.
सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबर महिना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हे राशी परिवर्तन काही ग्रहांच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तर काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावं लागणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
बुध ग्रह संक्रमण 2024 (Mercury)
ज्योतिष शास्त्रानुसार, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजून 13 मिनिटांनी ग्रहांचा राजकुमार म्हणजे बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे अनेकांना चांगलाच लाभ होणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले कार्य पूर्ण होतील.
शुक्र ग्रह संक्रमण (Venus)
13 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. हे राशी परिवर्तन सकाळी 06 वाजून 13 मिनिटांनी होणार आहे. हे संक्रमण मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
सूर्य ग्रह संक्रमण (Sun)
17 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. हे राशी परिवर्तन सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी होणार आहे. या काळात तुम्ही जास्त सतर्क असण्याची गरज आहे. कोणालाही तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.
मंगळ ग्रह संक्रमण (Mars)
ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह 20 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. हे राशी परिवर्तन दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी होणार आहे. या काळात तुमची तब्येत अचानक बिघडू शकते. तुमच्या मनात सतत तणाव सुरु असेल. तसेच, या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तसेच, नवीन घर, वाहन, प्रॉपर्टी या संबंधित कोणताच निर्णय घेऊ नका. अन्यथा तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Numerology Of Mulank 4 : अत्यंत संशयी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्याशा गैरसमजुतीने सहज तोडतात नातेसंबंध