Gemini Weekly Horoscope 24th To 30th March 2024 : मिथुन राशीचा नवीन आठवडा खर्चिक असेल, त्यामुळे तुम्ही तुमचा पैसा हुशारीने खर्च करा. या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या जाणवतील. तुमची आर्थिक बाजू तशी मजबूत राहील. या आठवड्यात जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लव्ह लाईफमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. एकूणच मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope) 


या आठवड्यात लव्ह लाईफमध्ये मतभेद होऊ शकतात, वाद झाल्यास योग्य निर्णय घ्या. तुमच्या आधीच्या प्रियकराशी तडजोड करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. विवाहित लोकांनी विवाहबाद्य संबंध टाळावे, कारण त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.


मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)


या आठवड्यात तु्म्हाला व्यावसायातील तुमचा दरारा दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील. या आठवड्यात आयटी, हेल्थकेअर, लॉ, हॉस्पिटॅलिटी, इंजिनीअरिंग आणि डिझायनर्सचं शेड्युल पॅक असेल, तुमच्यावर कामाचा जास्त लोड असेल. नोकरदारांनी कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं आणि प्रगतीच्या नवीन संधी शोधाव्या. या आठवड्यात कामादरम्यान रागावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा.


मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)


नवीन आठवड्यात तुम्ही आर्थिक बाबतीत भाग्यवान राहाल. पैशासंबंधी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. धर्मादाय कार्यात तुम्ही पैसा खर्च करू शकता. मित्र किंवा नातेवाईकांसोबत चालू असलेले आर्थिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी तुम्ही घर किंवा जमिनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात शेअर बाजार आणि नवीन व्यवसायातील गुंतवणूक पर्यायांवर लक्ष ठेवा.


मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)


या आठवड्यात तुमच्या आरोग्यात किरकोळ चढ-उतार दिसेल. जे लोक मद्याचं सेवन करतात त्यांना या आठवड्यात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. शक्यतो अल्कोहोल पिणं टाळा. ऑफिसचा दबाव घरी आणू नका आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani Dev : शनि आणि बुध ग्रहाने नक्षत्र बदललं; ‘या’ 3 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, बक्कळ धनलाभासह येणार श्रीमंती