Astrology : अनेकांच्या आयुष्यात मैत्रीचं नातं हे अत्यंत महत्वाचं असतं. खऱ्या मित्र-मैत्रिणींची साथ लोक आयुष्यभर सोडत नाहीत. काही लोकांची फार कमी वेळात मैत्री होते पण काही लोक हे मित्रांची निवड करताना अनेक वेळा विचार करतात. आचार्य चाणक्य म्हणतात की, खरा मित्र संकटकाळात ओळखला जातो. मित्र तोच असतो जो सुख-दुःखातसोबत असतो. वृषभ (Taurus), मिथुन (Gemini) आणि वृश्चिक (Scorpio) या राशींचे लोक फार कमी वेळात लोकांसोबत मैत्री करतात. जाणून घेऊयात या राशींच्या लोकांबाबत...


वृषभ  (Taurus):


वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यानं या राशींच्या लोकांची अनेकांसोबत मैत्री असते. त्यांच्या मित्रांची संख्या जास्त असते. वृषभ राशींच्या लोकांकडे इतरांना आकर्षित करण्याची विशेष प्रतिभा असते. त्यांच्या बोलण्याने आणि जीवनशैलीने प्रभावित होऊन प्रत्येकालाच त्यांच्यासोबत मैत्री करावी वाटते. 


मिथुन  (Gemini) :


ज्या लोकांची रास मिथुन असते ते मैत्री आणि कुटुंब या गोष्टींना विशेष महत्व देतात. हे लोक लवकर मैत्री करत नाहीत, पण एकदा मैत्री केली तर ती मैत्री टिकवतात. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात बुधला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. हा ग्रह शुभ असल्यानं या रोशींचे लोक लोकप्रिय असतात. त्यामुळे हे लोक मैत्री करताना अनेक वेळा विचार करतात. 


वृश्चिक (Scorpio) :


या राशींच्या लोकांचे फार कमी मित्र असतात. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशींचे लोक खूप मेहनती असतात. या राशींच्या लोकांच्या मैत्रिणींची संख्या जास्त असते. हे लोक ते सिद्धांतवादी असतात.  यामुळेच त्यांचे मित्रही त्यांचे आदर करतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :