Gemini Monthly Horoscope : उद्यापासून एप्रिल महिना सुरू होत आहे. हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी महत्वाचा आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मिथुन राशीच्या लोकांना असे वाटू शकते की, त्यांच्यावर कामाचा खूप दबाव आहे, किंवा त्यांना खूप कामाचा ताण दिला जात आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही विषयावर जास्त विचार करून मानसिक त्रास होऊ शकतो. ग्रहांची स्थिती समजून घेऊन स्वतःला ताजेतवाने ठेवा. याशिवाय जे लोक एखाद्या स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांनाही आनंदाने जगावे लागेल. महिन्याच्या मध्यात परदेश प्रवासाचे नियोजन करता येईल. आर्थिक लाभासाठी मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला जाणार आहे. जुने पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. याबरोबरच तुमचे विरोधक तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करू शकतात.
नोकरी आणि आर्थिक : नोकरदार लोकांना या महिन्यात कार्यालयात थोडासा तणाव जाणवू शकतो. कार्यालयीन राजकारणाचीही शक्यता आहे. अशा स्थितीत शत्रूंबाबत सतर्क राहावे लागेल. काही गोष्टी सकारात्मक देखील घडू शकतात. तुमच्या बॉसचा हात तुमच्या डोक्यावर असेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. परंतु, 10 एप्रिलपासून तुम्हाला खूप काळजीपूर्वक काम करावे लागेल. कारण या महिन्यात एखादी छोटीशी चूक मोठी समस्या बनू शकते. व्यापाऱ्यांनाही या महिन्यात काळजी घ्यावी लागेल. काही लोक तुमचा फीडबॅक खराब करण्याचा प्रयत्न करतील. याबाबत तुम्हाला सतर्क राहावे लागेल. याबरोबरच घरात असो किंवा बाहेर, तुम्हाला प्रत्येक व्यक्ती माझ्यावर राज्य करत आहे, असे वाटेल किंवा घरातही ते जाणवेल. कीटकनाशकांचा व्यवसाय करणाऱ्यांच्या औषधांची या महिन्यात चांगली विक्री होईल.
आरोग्य : मिथुन राशीच्या लोकांना या महिन्यात डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. शिवाय ज्या लोकांना नियमितपणे वारंवार मायग्रेनचा त्रास होतो, त्यांना खूप काळजी घ्यावी लागेल. डोळ्यांची काळजी घ्यावी लागले. खूप दिवसांपासून डोळे तपासले नसतील तर या वेळी तपासणी करून घ्यावी. डोळ्यांचा नंबर थोड्याफार प्रमामात बदल झाल्यामुळे डोकेदुखी त्रास जाणवू शकतो. कामासोबतच तुम्हाला तुमच्या तब्येतीकडेही लक्ष द्यावे लागेल. खूप तणाव आणि ओव्हरलोडमुळे तुम्ही आजारी पडू शकता. ज्यांना जास्त भूक लागते त्यांनी सतत थोडे-थोडे खावे, पोट रिकामे राहू नये याची काळजी घ्यावी. उंचीवर काम करणाऱ्यांनी थोडे सतर्क राहा.
कौटुंबिक आणि समाजिक : हा महिना जवळजवळ सामान्य राहणार आहे. किरकोळ आर्थिक नुकसानीमुळे घराचे बजेट बिघडू शकते. 10 तारखेनंतर मौल्यवान वस्तूंवर बारीक लक्ष ठेवा. जोडीदारासोबत किरकोळ वाद होऊ शकतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून तुम्हाला राग येऊ शकतो, अशा वेळी घरातील सुख-शांती लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरातील सर्वात लहान असलेल्या मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाचे पालन करावे. कुटुंबापासून दूर असलेल्यांनी कुटंबातील सदस्यांसोबत फोनवरून संवाद साधावा. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे देखील वाचा :