Gemini Horoscope Today 8 November 2023: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही खूप उत्साहाने भरलेले असाल. तुमच्या कुटुंबात चांगलं वातावरण राहील. आज तुमचा स्वतःवर विश्वास असायला हवा आणि कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक वादापासून दूर राहा, अन्यथा एखादा छोटासा वाद मारामारीचं रूप घेऊ शकतो आणि त्यासाठी तुमच्यावर आरोप होऊ शकतात. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पैसे गुंतवू शकता. तुम्हाला आज लाभ मिळतील. आज तुमचं मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंताग्रस्त असेल.


तुमच्या मनात मानसिक अडचणी वाढू शकतात. तुमच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर आज तुमचं तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून भांडण होऊ शकतं, ज्यामुळे तुमचं मन खूप अस्वस्थ होऊ शकतं. तुमच्या मुलांकडून तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात परदेशातही प्रवास करू शकता. जिथे तुम्हाला मोठा करार मिळू शकतो.


मिथुन राशीच्या लोकांचं आजचं आरोग्य


मिथुन राशीच्या लोकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुम्ही सौम्य खोकला आणि सर्दीची तक्रार करू शकता. पण तीव्र खोकला असेल तर औषधं जरूर घ्या.


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. आज तुमच्यासाठी 1 हा लकी नंबर असेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Diwali 2023: दिवाळीपर्यंत बनणार 'हे' शुभ योग; सुख, शांती आणि समृद्धी नांदणार