Diwali 2023 Date: हिंदू धर्मात दिवाळी (Diwali 2023) हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला हा सण साजरा केला जातो. यावेळी 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशीपासून दिवाळी सण सुरू होत आहे. 12 नोव्हेंबरला अभ्यांग स्नाने मुख्य दिवाळी साजरी केली जाईल, याच दिवशी लक्ष्मी पूजन असेल. मंगळवारी, 14 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा असेल आणि 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाईल. यासह दिवाळी हा सण समाप्त होईल. यावेळी दिवाळीपर्यंत अतिशय शुभ योग तयार होत आहेत, ज्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे.
Diwali Puja timings 2023 : ग्रह आणि ताऱ्यांचा शुभ संयोग
ज्योतिषी डॉ. अनिश व्यास यांनी सांगितलं की, भारतीय ज्योतिषशास्त्रात योगांचं खूप महत्त्व आहे. यंदा दिवाळीपूर्वी पुष्य नक्षत्रासह अष्ट महायोगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. यंदा 500 वर्षांनंतर दिवाळीत अनेक राजयोग तयार होत आहेत. शनीचं कुंभ राशीत थेट भ्रमण झाल्यामुळे षष्ठ योग तयार होत आहे. त्याचबरोबर मंगळ आणि सूर्याचा संयोगही राजयोग निर्माण करत आहे. तसेच तूळ राशीतील आयुष्मान योग आणि बुधादित्य राजयोगामुळे अनेक राशींवर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे.
रविवारी देखील सर्वार्थ सिद्धी योग असणं विशेष फलदायी मानलं जातं. सर्वार्थ सिद्धी योगात केलेली सर्व कार्यं सफल होतात. खरेदीपासून ते पॉलिसी, बँकिंग इत्यादी सर्व गोष्टींसाठी हे खूप शुभ मानलं जातं. वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांच्या शुभ संयोगाचा विशेष लाभ होईल.
Diwali 2023 : दिवाळीपर्यंत हे योग येतील
रवि पुष्य योग - रविवार 5 नोव्हेंबर 2023अमृत योग, कुमार योग - सोमवार 6 नोव्हेंबर 2023कुमार योग - मंगळवार 7 नोव्हेंबर 2023अमृत योग - बुधवार 8 नोव्हेंबर 2023अमृत योग - गुरुवार 9 नोव्हेंबर 2023प्रीति योग - शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023सर्वार्थ योग - रविवार 12 नोव्हेंबर 2023सर्वार्थ सिद्धी योग- मंगळवार 14 नोव्हेंबर 2023
Diwali Puja timings 2023 : दिवाळी पूजेसाठी शुभ मुहूर्त
यंदा दिवाळीची पूजा 12 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त 12 नोव्हेंबरला सायंकाळी 5.40 ते 7.36 पर्यंत आहे, लक्ष्मी-गणेशाच्या पूजेचा हा शुभ मुहूर्त आहे. ज्योतिषांच्या मते, या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी येते.
Diwali 2023 : वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत सर्व तारखा
9 नोव्हेंबर - वसुबारस10 नोव्हेंबर - धनत्रयोदशी11 नोव्हेंबर - मासिक शिवरात्री12 नोव्हेंबर - दिवाळी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान (पहिली अंघोळ)13 नोव्हेंबर - सोमवती अमावस्या14 नोव्हेंबर - दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा, गोवर्धन पूजन, अन्नकुट15 नोव्हेंबर - भाऊबीज
हेही वाचा:
Diwali 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! 'या' राशींच्या लोकांवर पडणार पैशांचा पाऊस