Gemini Horoscope Today 1st April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमची जुन्या मित्राबरोबर (Friend) अचानक भेट होऊ शकते ज्याला भेटून तुम्ही तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा द्याल. राजकारणासाठी (Politics) आजचा काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधीही मिळेल. आज तुमच्या व्यवसायात (Business) फायदा होण्याची शक्यता आहे. उच्च अधिकार्‍यांचेही सहकार्य मिळेल, ज्यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या नोकरीत (Job) प्रगतीची संधी मिळेल. जे लोक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी देखील मिळतील, ज्यामुळे तुम्ही पैसे कमवू शकाल.



आज धनलाभ होण्याची शक्यता


मिथुन राशीच्या लोकांनी जर आज विचारपूर्वक केलेली गुंतवणूक केली तर ती तुमच्यासाठी फायद्याची राहील. आज अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे मिळू शकतात. राजकारणातही आज चांगली संधी आहे. अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होतील. आज तुमचे बऱ्याच काळापासून सुरू असलेलं कायदेशीर काम संपेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडल्यास आर्थिक लाभ होईल.


आज मिथुन राशीचे कौटुंबिक जीवन


कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. आज काही धार्मिक चर्चेत सहभागी देखील होऊ शकता. अचानक पाहुणे घरी आल्याने तुमचा खर्च वाढू शकतो, पण पाहुणे आल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. संध्याकाळी एखाद्या शुभ समारंभास उपस्थित राहण्यास मिळेल. 


आज मिथुन राशीचे आरोग्य


मिथुन राशीच्या लोकांना स्नायूंच्या त्रासाशी संबंधित काही समस्या असू शकतात. उत्साहात भान हरपू नका आणि कामात घाई करू नका. सकाळी उठून योगासने आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल.


मिथुन राशीसाठी आजचे उपाय


अडथळे आणि रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी तृतीयपंथीयांना हिरवे कपडे दान करा आणि हिरवा मूग मंदिरात किंवा गरजूंना दान करा.


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 1st April 2023 : महिन्यातला पहिला शनिवार 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य