Gemini Horoscope Today 11th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जे व्यवसाय करतायत त्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने खूप आनंद होईल. आज तुम्हाला नोकरीच्या अनेक संधीही मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. ज्या ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी राहू शकतील अशा एखाद्या छान ठिकाणी तुम्ही भेट देण्याची योजना आखू शकता.
खर्च कमी करा
मिथुन राशीच्या लोकांनी आज वादविवादापासून लांब राहणं योग्य ठरेल. तुमचे बाकी दिवस चांगले असतील. व्यावसायिकदृष्ट्या व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावं लागेल. अनोळख्या व्यक्तीबरोबर कोणत्याही प्रकारची देवणाघेवाण करू नका. नोकरदार वर्गाला कामाचा मोबदला चांगला मिळेल. खर्च कमी करा.
धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा
परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत घेतील. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. तुमच्या मनाला थोडी शांती मिळेल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
आज मिथुन राशीचे आरोग्य
आज मिथुन राशीचे आरोग्य पाहता हृदयरोग असलेल्या लोकांना काही समस्या असू शकतात आणि अशा स्थितीत निष्काळजीपणा तुम्हाला अधिक महागात पडू शकतो. यासाठी औषधांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा आणि बाहेरचे खाणे टाळा.
मिथुन राशीसाठी आजचे उपाय
रामरक्षा स्त्रोत्राचे पठण करा आणि गायीला हळद, गूळ, हरभरा डाळ खाऊ घाला.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :