Gauri Pujan 2024 : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2024) सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जातोय. घरोघरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता गौराईंचं (Gauri Pujan) आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज गौरी पूजनाचा दिवस आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की, गौराईचं आवाहन अनुराधा नक्षत्रावर, पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर, तर विसर्जन मूळ नक्षत्रावर केलं जातं. 


गौरी पूजन हे महाशक्तीचं पूजन म्हटलं जातं. ही महाशक्ती म्हणजे पार्वती आणि ती शंभूमहादेवाची शक्ती आहे. सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन, पूजन म्हणजे घरात भरभराट, आनंद, ऐश्वर्य आणि सुख-संपत्ती येते असं म्हणतात. तर, गौरी पूजनासाठी नेमकं कोणते साहित्य लागतात ते जाणून घेऊयात. 


गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य


गौरी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये तांब्या, फुलपात्र, ताम्हण, पूजेचं ताट, कर्पूरपात्र, घंटा, पळी. पूजेच्या साहित्यात तांब्याची आणि चांदीची भांडी वापरावीत. 


पूजेसाठी लागणारे साहित्य


हळद, कुंकू, गंध, अक्षता, गुलाल, अबीर, सुपाऱ्या , विड्याची पाने, नारळ, गूळ, खोबरं, खारिक, बदाम, पाच प्रकारची फळं, सुगंधी तेल, पंचामृतासाठी दूध, दही, तूप मध, साखर, तांदूळ, गहू, नाणी यांसारखे साहित्य लागेल. 


फुले


नागचाफा, केवडा, कण्हेर, बकुळ, भेंडी, कमळ, शेवंती, जाई, जुई, मोगरा, अशोक, पारिजात, जास्वंद, सोनचाफा.


पत्री


बेल, आघाडा, मालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोरी, रुई, तुळस, डाळींब, धोत्रा, बकुळ, अशोक


अलंकार


मणिमंगळसूत्र, बांगड्या, साडी, हिरवी चोळी, खण.


गौरी पूजन करताना सर्व साहित्याची तयारी आधीच करून ठेवा, म्हणजे आयत्यावेळी धावपळ होणार नाही. गौरी भोजनाच्यावेळी सवाष्ण महिलेला जेवणासाठी बोलाविले जाते त्याची सोय देखील आधीच करावी. गौरी पूजनासाठी खास नैवेद्य असतो, त्यात सोळा भाज्या केल्या जातात, त्याची तयारी आधीच करून ठेवा. गौरीचे आवाहन करण्याच्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धती आहेत. काहीजणी सोने, चांदी, पितळ किंवा मातीच्या मुखवट्यावर, तर काहीजणी सुघट (मातीचे भांडे) घेवून, किंवा वाहत्या पाण्याच्या खड्यांवर गौरीचे आवाहन करतात. काहीजणांच्या घरी उभ्या गौरी असतात त्यांना शालू नेसवून, दागिने घालून त्यांची पूजा केली जाते. कुळाचाराने गौरीपूजनाची जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार गौरी पूजन केलं जातं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Gauri Pujan 2024 : आज गौरी पूजनाचा दिवस; गौराई पूजनाची कथा आणि पद्धत नेमकी काय? जाणून घ्या सविस्तर