Garud Puran: गरुडपुराणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचा ग्रंथ मानले जाते, या पुराणानुसार मृत्यूला शेवट म्हणून पाहिले जात नाही, तर नवीन सुरुवात म्हणून पाहिले जाते. गरुडपुराणानुसार, मृत्यूनंतर आत्मा त्याच्या कर्मानुसार नवीन शरीरात जन्म घेतो. आत्मा अमर आहे आणि शरीर हे त्याचे वाहन आहे. मृत्यूच्या वेळी, आत्मा शरीर सोडतो आणि नवीन जन्मासाठी निघून जातो. हा एक अमर घटक आहे, जो शरीराचा नाश झाल्यानंतरही जिवंत राहतो. अशात जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो, तेव्हा त्याचे नातेवाईक खूप रडतात. काहीजणांसाठी तो मृत व्यक्ती इतका जवळचा असतो, की ते त्याची बऱ्याच वेळेस आठवण काढून रडतात. पण तुम्हाला माहितीय का? असं करणं तुमच्यासाठी किती घातक ठरू शकतं? काय म्हटलंय गरुडपुराणात? जाणून घ्या...
...ते आत्मे या विश्वात फिरत असतात.
गरुडपुराणानुसार, आत्महत्या, खून किंवा अपघातादरम्यान तुमच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर चुकूनही एक चूक करू नये. ती म्हणजे त्या व्यक्तीची पुन्हा पुन्हा आठवण काढून रडणे. पुन्हा पुन्हा त्याच्या विचारात हरवून जाणे, कारण अकाली मरणाऱ्या लोकांचे आत्मे या विश्वातून जात नाहीत. मृत्यूची अंतिम तारीख समोर येईपर्यंत ते आत्मे या विश्वात फिरत असतात. मृत्यूनंतर, आत्मा एका प्रवासाला निघतो, ज्यामध्ये तो त्याच्या मागील जन्माच्या कर्माचे फळ अनुभवतो. पण अकाली मरण पावणाऱ्यांच्या आत्म्याशी आसक्ती किती घातक असते ते जाणून घेऊया.
जेव्हा तुम्ही खूप रडता तेव्हा...
गरुडपुराणानुसार, जेव्हा तुम्ही खूप रडता तेव्हा हे आत्मे पाहतात की तुम्हाला त्यांचा अजूनही मोह आहे. तुम्हाला स्वतःकडे खेचून त्यांच्या जगात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तुझी खूप आठवण येत आहे, खूप रडतोय, असं बोलून जेव्हा तुम्ही रडता, तेव्हा त्या आत्म्यांना असं वाटतं की कोणीतरी खास आपल्यासाठी आहे, ज्याच्याशी ते बोलू शकतील. कारण त्या आत्म्यांना खूप वेदना होतात. त्यांना अशा व्यक्तीची गरज आहे जिच्याशी ते बोलू शकतील, स्वतःबद्दल सांगू शकतील आणि त्यांची इच्छा व्यक्त करू शकतील. जेव्हा तुम्ही मानवी रूपात असता तेव्हा ते ते काम करू शकत नाही. म्हणूनच तुमच्या मृत्यूनंतर ते तुम्हाला त्यांच्या जगात खेचण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच असे म्हटले जाते की अपघातात जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, आत्म्याचा प्रभाव धोकादायक असू शकतो.
आत्मे तुम्हाला त्यांच्या जगात खेचण्याचा प्रयत्न करतात..
धार्मिक मान्यतेनुसार, आत्मा त्यांची शेवटची तारीख येईपर्यंत या विश्वात भटकत राहतात. आत्मे वारंवार आठवण करून आणि रडून तुम्हाला त्यांच्या जगात खेचण्याचा प्रयत्न करतात. हे टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मृत व्यक्तीशी असलेला मोह सोडून देणे.
हेही वाचा>>>
Garud Puran: विवाहित स्त्रीने पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाशी संबंध का ठेवू नयेत? गरुडपुराणात सांगितलेली 'अशी' भयंकर शिक्षा, अंगावर येईल काटा!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )