Ganesh Visarjan 2025 : गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) 10 दिवसांचा उत्सव अगदी धूमधडाक्यात, जल्लोषात साजरा केल्यानंतर आता बाप्पाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे. यावेळी गणपती विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्व 12 राशींनी कोणते सोप आणि प्रभावी उपाय करावेत. याच संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे ती जाणून घेऊयात.
सर्व 12 राशींकरिता उपाय
- मोदक अर्पण – बाप्पाला 5 किंवा 11 मोदक अर्पण करून “ॐ गं गणपतये नमः” 11 वेळा जप करा.
- दूर्वा अर्पण – गणपतीला 21 दुर्वांचे तुपात बुडवून अर्पण करा, यामुळे संकट नष्ट होतात.
- लाल फुल अर्पण – लाल जास्वंद किंवा लाल फुल ठेवले तर लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो.
- नाणे अर्पण – पूजेच्या वेळी बाप्पाच्या चरणी एक नाणे ठेवून विसर्जनानंतर ते तिजोरीत ठेवा, धनवृद्धी होते.
- मंत्र जप – “ॐ श्री गणेशाय नमः” हा मंत्र 108 वेळा जपावा.
- आरती व प्रार्थना – घरातील सर्व सदस्यांनी बाप्पाची आरती करून त्यांच्याकडून क्षमायाचना आणि पुनः आगमनाची प्रार्थना करावी.
- अन्नदान/वस्त्रदान – विसर्जनाच्या दिवशी गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान केल्यास पुण्य प्राप्त होते.
- पर्यावरणपूरक विसर्जन – शक्य असल्यास मूर्ती घरातच विसर्जित करा किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करा, यामुळे पाप नष्ट होऊन पुण्य लाभते.
- विशेष इच्छा – विसर्जनावेळी मनात जे एकच संकल्प/इच्छा असेल ती बाप्पाला सांगा, त्याची पूर्णता लवकर होते.
गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्व 12 राशींनी हे उपाय एकसमान पद्धतीने करावेत. तसेच, बाप्पाच्या विसर्जना दरम्यान “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” हे उद्गार काढणे विसरू नका.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हेही वाचा :