Weekly Horoscope 8 To 14 September 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर (September) महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. तसेच, या आठवड्यात चंद्रग्रहण लागणार आहे तसेच, पितृपक्षाची (Pitru Paksha 2025) सुरुवात होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरचा हा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही सामंजस्याने व्यवहार कराल. तुमच्या आत्मविश्वासात एक प्रकारे चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांच्या नवीन आठवड्यात काही चांगल्या सवयी जडतील. पैशांशी संबंधित तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तु्म्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. जुने वादविवाद मिटतील. नवीन कार्याची सुरुवात कराल. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. 

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात तुमच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, या काळात धार्मिक यात्रेला जाण्याचा देखील तुम्ही प्लॅन करु शकता. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी नियमित व्यायाम करा. आणि सकस आहार घ्या. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. तुम्हाला या काळात एखादी शुभवार्ता मिळेल. तसेच, तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. नशिबाची साथ तुमच्या पाठीशी असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. या काळात तुमच्या हातून पुण्याचं कार्य घडेल. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा काहीसा सामान्य असणार आहे. या काळात ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्यावर परिणाम होणार आहे. तसेच, व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.  तुमची आर्थिक स्थिती सामान्य असेल. तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. तसेच, तुमच्या जीवनात आनंद टिकून राहील. हा आठवडा तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवून जाईल. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या ाकळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. ग्रहांची शुभ स्थिती असल्यामुळे अनेक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढलेला दिसेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. 

हेही वाचा :                             

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Chandra Grahan 2025 : शनिच्या राशीत लागणार वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण; 7 सप्टेंबरपासून 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य, नशिबाचे दार उघडणार