Ganesh Visarjan 2025 : हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला (Ganesh Visarjan) फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. या दिवशी गणपतीबरोबरच भगवान विष्णूचीही पूजा करण्याची परंपरा आहे. अग्नि पुराणात तसा उल्लेख आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी करतात. या दिवशी गणरायाचं आपण विसर्जन करतो.
धार्मिक मान्यतेनुसार, यंदा 6 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच उद्या गणपती विसर्जनाचा दिवस आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लोक जिथे भगवान विष्णूची विधीवत पूजा करतात. त्याच पद्धतीने गणपती विसर्जनाच्या दिवशी लोक बाप्पाचं विसर्जन करतात. यंदा गणपती विसर्जनाच्या दिवशी शनिवार असल्या कारणाने अनेक दुर्लभ संयोग जुळून आले आहेत. या काळात आपल्या जेवणाच्या बाबतीत काही विशेष नियमांचं पालन करावं.
धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी पांढऱ्या रंगाच्या काही पदार्थांचं सेवन वर्जित मानण्यात आलं आहे. त्यामुळे या दिवशी कोणकोणते पदार्थ खाऊ नयेत ते जाणून घेऊयात.
बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी 'या' चुका करु नका
दही - गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी दह्याचं सेवन करु नये. यामुळे पुण्य फळाची प्राप्ती होणार नाही.
मीठ - अनंत चतुर्दशीच्या दिवशी चुकूनही मिठाचं सेवन करु नये. कारण यामुळे कुटुंबातील नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडतो. मान्यतेनुसार, या दिवशी केलेल्या चुकांची शिक्षा तुम्हाला पुढचे 14 वर्ष भोगावी लागू शकते. तसेच, घरातील सगळा आनंद निघून जातो.
तांदूळ - तांदूळ हा खरंतर आरोग्यासाठी चांगला असतो. मात्र, उपवासाच्या दिवशी याचं सेवन करु नये. मान्यतेनुसार, या दिवशी भात खाल्ल्याने उपवासाचं फळ प्राप्त होत नाही.
हे पदार्थ वर्जित का?
धार्मिक मान्यतेनुसार, पांढरा पदार्थ हा चंद्र आणि शीतल ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. मात्र, अनंत चतुर्दशीचा संबंध तप, संयम आणि उपवासाच्या कठोरतेशी जोडण्यात आला आहे. त्यामुळेच या दिवशी पांढऱ्या पदार्थांचं सेवन केल्याने उपवासाची पवित्रता कमी होते. आणि उपवासाचं पुण्य फळ मिळत नाही.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)