बारामती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती अभ्यागत मंडळावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी आता खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2021 साली महाविकास आघाडी सरकार असताना सदर मंडळावर सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यातील सरकार बदलल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे. या पदाचा कार्यकाळ हा दोन वर्षांसाठी असतो.
या पदाच्या जबाबदाऱ्या काय?
1) अंमलात असलेले नियम व आदेश यांच्या चौकटीमध्ये राहून रुग्णालयाच्या व्यवस्थापनांत सुधारणा करण्यासाठी मार्ग व साधने तयार करणे.2) निरनिराळ्या कामासाठी व विभागांसाठी मंजूर केलेल्या आर्थिक तरतूदींचा योग्य प्रकारे चापर होत आहे किंवा नाही यायर देखरेख ठेवणे.3) रुग्णालयाच्या संबंधिच्या जनतेच्या तक्रारीचा अभ्यास करणे व त्याचे निवारण होण्यासाठी करावयाच्या पध्दतीबद्दल शिफारस करणे,4) रुग्णालयातील कर्मचारी वर्गाची अनियमित उपस्थिती, अवक्तशीरपणा व गैरवर्तन इत्यादींबाबत आ घेणे व त्यांत सुधारणा व्हावी म्हणून शिफारस करणे.5) रुग्णालय परिसराची तपासणी करणे, सर्वसाधारण कामकाजांचा अभ्यास करणे व दोष आढळल्यास ते दूर करण्यासाठी उपाय सुचविणे,6) रूग्णालयासाठी जनतेकडून देणग्या निमंत्रित करणे, गोळा करणे व स्विकारणे व राज्य शासनास रुग्णालयांसाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही अशा विशेष बाबींसाठी त्या उपयोगात आणणे, कोणती देणगी स्विकारण्यामध्ये अथवा तिचा रुग्णालयासाठी उपयोग करताना अंमलात असलेल्या नियमांचा व आदेशांचा भंग होता कामा नये.7) वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी समितीच्या कामकाजामध्ये आवश्यक त्या पध्दती विहीत करणे व इतर आवश्यक त्या गोष्टी करणे.8) आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अमंलबजावणीचा आढावा घेणे.