Ganesh Chaturthi 2024 : 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशाची (Lord Ganesh) स्थापना होणार आहे. याचा आनंद, उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय. गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav) घरात काही शुभ गोष्टी आणल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो. गणपतीला अनेक गोष्टी आवडतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात काही वस्तूंची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गणेशोत्सवादरम्यान या वस्तू घरी आणल्याने कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि बाप्पाही प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात, असा समज आहे. या गोष्टी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

  


गणेशोत्सवादरम्यान 'या' वस्तू घरी आणा


1. एकमुखी नारळ


असं म्हणतात की, गणेशोत्सवा दरम्यान घरी एकमुखी नारळ आणावा. हे अत्यंत शुभ मानलं जातं. पूजेमध्ये एकमुखी नारळ तुम्ही अर्पण करु शकता आणि नंतर पूजास्थानी किंवा तिजोरीत ठेवा. असं म्हणतात की, नारळात धन आकर्षित करण्याची अद्भूत शक्ती आहे.  


2. गणेशाची मूर्ती


गणेश चतुर्थीनिमित्त अनेकजण घरी मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. मात्र यानंतर गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दरम्यान तुम्ही छोटी गणेशाची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो घरात आणू शकता. तसेच, घराच्या उत्तर दिशेला ही मूर्ती ठेवा. यामुळे घरात नकारात्मक शक्तींचा वावर होणार नाही. 


3. शंख


हिंदू धर्मात शंखामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. गणेशोत्सवाच्या विशेष प्रसंगी शंख घरी आणल्याने आर्थिक प्रगती होते आणि वास्तुदोषही दूर होतात. त्यामुळे या दिवसात शंख आणून गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर दररोज शंख वाजवावा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रसार वाढेल.


4. कुबेर देवता


भगवान कुबेर हे संपत्तीचे देवता मानले जातात. कुबेर देवाची मूर्ती घरात ठेवल्याने गणेश आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि घरातील दारिद्र्यही दूर होते.


5. बासरी


घरात बासरी ठेवणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही चांदीची बासरी देखील ठेवू शकता. यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या या शुभमुहूर्तावर बासरीची खरेदी नक्की करा.


विद्येची देवता, संकटांचं निवारण करणारी देवता


गणेश ही विद्येची देवता, संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ' श्री गणेशाय नम: ' म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात. हा देव सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे या देवाचे पूजन सर्वांच्या घरी होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Ganesh Chaturthi 2024 : घरात गणपतीची स्थापना करताना 'या' 10 गोष्टींची काळजी घ्या; जाणून घ्या बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त