Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi ) हा सर्वांच्या आवडीचा सण, हा सण दरवर्षी भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. यावेळी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi ) साजरी होणार आहे. काही राशीच्या लोकांसाठी ही गणेश चतुर्थी खूप खास असणार आहे. कारण या राशीच्या लोकांना गणपतीची (Ganesh) कृपा असेल. त्याच्या कृपेने त्यांची सर्व संकट दूर होतील. संपत्ती वाढेल, त्यामुळे गणेशपूजनाच्या वेळी त्यांनी या गोष्टी अवश्य कराव्यात.
गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi ) करा हे खास उपाय
- श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi ) दिवशी गुळाच्या 21 लहान गोळ्या करा. या गोळ्या दुर्वासोबत गणेशाच्या (Ganesh ) चरणी अर्पण करा. गणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतील.
- गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान वगैरे करून श्रीगणेशाची विधिवत पूजा करून गुळमिश्रित शुद्ध तूप अर्पण करावे. त्यानंतर ते गायीला खाऊ घाला. भगवंताच्या कृपेने अपार संपत्ती मिळू शकते.
- एका स्वच्छ पिवळ्या कपड्यात 11 गुंठ्या दुर्वा आणि एक गुठळी हळद घेऊन बंडल बनवा. आता गणेश चतुर्थीपासून पुढील 10 दिवस या गठ्ठ्याची पूजा विधीपूर्वक करा. दहाव्या दिवशी पूजा केल्यानंतर तिजोरीत ठेवा. पैशाची कमतरता कधीच भासणार नाही.
कर्क : कर्क राशीच्या लोकांवर गणेशाची विशेष कृपा राहील. गणेशाच्या कृपेने नोकरीत प्रगती आणि व्यवसायात नफा होईल.
वृश्चिक : श्रीगणेशाच्या कृपेने तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. व्यवसाय वाढेल आणि नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात.
तूळ : व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते . कोणतीही अडवणूक न करता सर्व कामे होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या