GajKesari Rajyog 2025: होळी हा सर्वांसाठी आनंदाचा सण असतो. मात्र वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या आनंदाला आणखी चारचांद लागणार आहेत. होळीपूर्वी काही राशीचे लोक मालामाल होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली हालचाल बदलतो. हा बदल सर्व 12 राशींवर परिणाम करतो. काहींसाठी ते खूप शुभ असते, तर काहींसाठी हा प्रभाव अशुभ असतो. अशात होळीपूर्वी एक असा दुर्मिळ राजयोग तयार होतोय, ज्यामुळे अनेकांचं आयुष्य बदलणार आहे...
शक्तिशाली गजकेसरी राजयोग तयार होणार!
ज्योतिषशास्त्रानुसार, 5 मार्च 2025 रोजी सकाळी 8:12 वाजता चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल. देवगुरु बृहस्पती येथे आधीच उपस्थित आहेत. यामुळे या राशीत शक्तिशाली गजकेसरी राजयोग तयार होईल. गजकेसरी योग हा एक शुभ राजयोग आहे. जेव्हा बृहस्पति केंद्र भावात म्हणजेच 1ल्या, 4व्या, 7व्या किंवा 10व्या भावात स्थित असतो आणि चंद्राच्या शुभ पक्षाशी संयोग बनतो, तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात अद्भूत बदल घडून येतील. जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा गजकेसरी योग अद्भुत असणार आहे.
5 राशीच्या लोकांना शुभ परिणाम देणार..
ज्योतिषशास्त्रात बृहस्पतिला ज्ञान, संपत्ती आणि विस्ताराचे प्रतीक मानले जाते. यासोबतच चंद्राला मन आणि भावनांचे प्रतीक मानले जाते. या कारणास्तव, वृषभ राशीमध्ये तयार झालेला हा योग या पाच राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल. यामुळे मानसिक शांतता आणि निर्णय क्षमता वाढेल अशी अपेक्षा आहे.
वृषभ - करिअरमध्ये प्रगती होईल
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीतच हा शुभ योग तयार होणार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊन त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. यासोबतच कौटुंबिक सुख-समृद्धी, मान-सन्मानही वाढेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात.
कर्क - आर्थिक लाभ होईल
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांच्या 11व्या घरात हा शुभ योग तयार होत असेल तर हा योग बनल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होईल. यासोबतच गुंतवणूक आणि व्यवसायातून चांगला नफा अपेक्षित आहे. नवीन नियोजनात यश मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल.
कन्या - नशिबाची पूर्ण साथ मिळेल
कन्या राशीच्या लोकांच्या 9व्या घरात गजकेसरी योग तयार होईल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यासोबतच तुम्हाला प्रवासाचा फायदा होईल. तुमच्या करिअरमध्येही तुम्हाला यश मिळेल अशी अपेक्षा आहे. शिक्षण, अध्यात्म आणि परदेश प्रवासाच्या चांगल्या संधी आहेत.
मकर - प्रेमसंबंध आणि शिक्षणात यश मिळण्याची शक्यता
मकर राशीच्या लोकांच्या पाचव्या घरात हा योग तयार होणार आहे. मकर राशीच्या लोकांना या काळात संतती सुख मिळेल. यासोबतच तुम्हाला प्रेमसंबंध आणि शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच शेअर मार्केट आणि सट्टा बाजाराशी संबंधित लोकांना फायदा होणार आहे.
मीन - उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळतील
मीन राशीच्या लोकांसाठी हा योग खूप भाग्यवान असणार आहे. 11व्या घरात हा योग तयार होत आहे. त्यामुळे नोकरीत प्रगती आणि व्यवसायात लाभ होईल. यासोबतच तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल.
हेही वाचा>>>
Shani Dev: मार्चमध्ये 'या' राशीच्या लोकांनी सावधान! शनीची साडेसाती सुरू होणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )