Gajkesari Rajyog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. याचा परिणाम देशभरात तसेच, समाजावर, व्यक्तीवर होताना दिसतो. या ग्रहांमध्ये बृहस्पती ग्रहाचं महत्त्व विशेष आहे. बृहस्पती ग्रह वर्षातून एकदाच राशी परिवर्तन करतात. मात्र, मे 2025 मध्ये मिथुन राशीत प्रवेश करताच तो अधिक गतीने संक्रमण करणार आहे. तसेच, पुढच्या आठ वर्षांत या ग्रहाचा अनेक राशींवर प्रभाव दिसून येणार आहे. या दरम्यान गुरु ग्रहाचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर संयोग जुळून येतो किंवा दृष्टी टिकून राहते. 

Continues below advertisement

येत्या 5 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच उद्या बृहस्पती ग्रह पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याच दिवशी चंद्रसुद्धा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांच्या या युतीने गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. हा योग जवळपास 54 तासांचा असणार आहे. मात्र, याचा प्रभाव दिर्घकाळ असणार आहे. तसेच, या गजकेसरी राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना जीवनातील प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. भौतिक सुख शांती मिळेल. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात . 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी हा गजकेसरी योग फार शुभकारक ठरणार आहे. या काळात गुरु आणि चंद्र ग्रह यांच्यामुळे तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमचे विचार स्पष्ट असतील. तुमची वाणी प्रभावशाली असेल. तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण राहील. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लग्न भावात जुळून येणारा हा गजकेसरी राजयोग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्यातील निर्णयक्षमता दिसून येईल. तसेच, कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, वैवाहिक जीवनात सुख शांती नांदेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या दहाव्या चरणात हा राजयोग निर्माण होणार आहे. या काळात तुमच्या करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. तुम्ही हाती घेतलेलं कार्य पूर्ण होईल. तसेच, आर्थिकदृष्ट्या तुमची परिस्थिती फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमचे अनावश्यक खर्च वाढतील. ते फक्त नियंत्रणात ठेवा.पैशांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल. 

हे ही वाचा :                                    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Dev Dhaiyya : 2026 मध्ये 'या' 2 राशींवर घोंगावणार संकटांचं वादळ; शनिच्या ढैय्यामुळे एकामागोमाग येतील आव्हानं, निर्णय घेताना 10 वेळा विचार करा