IPL 2022 : दिल्लीच्या पराभवासह आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील चार संघाची नावे स्पष्ट झाली. दिल्लीच्या पराभवामुळे आरसीबीच्या संघाला प्लेऑफध्ये स्थान मिळालेय. मुंबईने दिल्लीचा पाच विकेटने पराभव करत प्लेऑफमधून बाहेर काढले. आता गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि आरसीबी या चार संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय.
प्लेऑफमध्ये पोहचलेल्या चार संघापैकी फक्त राजस्थान संघाने आयपीएल चषक उंचावलाय. उर्वरित तीन संघ पहिल्या चषकासाठी एकमेंकाशी भिडणार आहे. राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये पहिला आयपीएल चषक उंचावला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा फायनलमध्ये धडक मारली आहे. अशात राजस्थान पुन्हा एकदा चषकावर नाव कोरणार की आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार? हे आठवडाभरात समजले. लखनौ आणि गुजरात या संघांनी यंदा आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. पदार्पणाच्या आयपीएल हंगामात या दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. तर आरसीबीने प्लेऑफमधील आपलं स्थान कायम ठेवलेय. आरसीबीने आतापर्यंत आठव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. मात्र एकदाही चषक उंचावता आलेला नाही.
क्रमांक | संघाचे नाव | एकूण सामने | विजय | पराभव | नेट रन रेट | गुण |
1 | गुजरात | 14 | 10 | 4 | 0.316 | 20 |
2 | राजस्थान | 14 | 9 | 5 | 0.298 | 18 |
3 | लखनौ | 14 | 9 | 5 | 0.251 | 18 |
4 | आरसीबी | 14 | 8 | 6 | -0.253 | 16 |
कोलकातामध्ये होणार प्लेऑफचे दोन सामने -
पहिला प्लेऑफ सामना : कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानवर क्वालीफायर 1 सामना होणार आहे. गुणतालिकेतील अव्वल दोन संघामध्ये 24 मे रोजी सामना रंगणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये धडक मारणार आहे. तर पराभूत झालेल्या संघाला एक संधी मिळणार आहे. पराभूत झालेला संघ क्वालीफायर दोन मध्ये खेळणार आहे. एलिमिनेटरचा विजेता संघ क्वालिफायर दोनमध्ये पोहचतो.
दूसरा प्लेऑफ सामना : एलिमिनेटरचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे. 25 मे रोजी हा सामना होणार आहे. गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहुलचा लखनौ संघ आहे. तर मुंबईच्या विजयानंतर आरसीबी चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यामुळे 25 मे रोजी आरसीबी आणि लखनौ यांच्यात सामना होणार आहे.
प्लेऑफचं वेळापत्रक -
क्वालिफायर 1: गुजरात vs राजस्थान, 24 मे - कोलकाता
एलिमिनेटर: लखनौ vs आरसीबी, 25 मे - कोलकाता
क्वालिफायर 2 - 27 मे - अहमदाबाद
फायनल: 29 मे - अहमदाबाद