Dwi Dwadash Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य (Surya Gochar 2025) एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने पाहायला मिळतो. सूर्यग्रहाला आत्मा, पिता, मान-सन्मानाचा कारक ग्रह मानतात. सध्या सूर्य धनु राशीत विराजमान आहे. या ठिकाणी मंगळ, शुक्र ग्रहाबरोबर युती करणार आहे. त्यामुळे अनेक शक्तिशाली राजयोग निर्माण होणार आहेत. तर, 23 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच आज रात्री सूर्य ग्रहाचा यमाबरोबर संयोग होणार आहे. यामुळे द्विद्वादश योग निर्माण होणार आहे. याचा काही राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

ज्योतिष शास्त्रानुसार, आज 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजून 14 मिनिटांनी सूर्य आणि यम ग्रह एकमेकांच्या 30 डिग्री अंशावर असतील. अशातच तब्बल 17 वर्षांनंतर द्विद्वादशाचा अद्भूत संयोग काही राशींसाठी फार खास असणार आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी हा योग फार शुभकारक मानला जातो. या काळात तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. तसेच, नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. तसेच, वर्षाच्या शेवटी मित्रांबरोबर किंवा तुमच्या पार्टनरबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करा. नोकरदार

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Horoscope)

सूर्य ग्रह या राशीच्या लग्न भावात विराजमान आहे. तर, यम दुसऱ्या चरणात विराजमान आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तुमच्या आनंदात दुप्पट वाढ होईल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राही. या काळात पार्टनरबरोबर तुम्ही एखाद्या ट्रिपला देखील जाऊ शकता. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्य-यमचा द्विद्वादश योग फार खास असणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमची रखडलेली कामे तुम्हाला पुन्हा सुरु करता येऊ शकतात. तसेच, पैशांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. सामाजिक कार्यांमध्ये तुमचं योगदान राहील. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं सहकार्य टिकून राहील. या काळात दान-पुण्याचं काम केल्यास तुम्हाला चांगलं फळ मिळेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Lakshmi Narayan Rajyog : 2025 वर्षाच्या शेवटी जुळून येतोय 'लक्ष्मी नारायण राजयोग'; 29 डिसेंबरपासून 'या' राशींची पाचही बोटं तुपात, बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट