Dussehra 2024 : शारदीय नवरात्रीनंतर (Shardiya Navratri 2024) दुसऱ्याच दिवशी विजयादशमी (Vijayadashmi) म्हणजेच दसरा (Dussehra 2024) साजरा केला जातो. विजयादशमीचा हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतात. त्यानुसार, उद्या म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. 


ज्योतिष शास्त्रानुसार, हा दिवस फार खास असणार आहे. कारण या दिवशी शश आणि मालव्य राजयोग असे दोन शुभ राजयोग जुळून येणार आहेत. त्यामुळे 12 राशींपैकी 3 राशींसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक लाभ देणारा असेल. या दरम्यान तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ  होईल. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ शुभ असणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होतील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार लाभदायक असणार आहे. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला चांगली वार्ता मिळू शकते. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती होईल. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सहभाग मिळेल. ज्या कार्यात तुम्ही मेहन घ्याल तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. मित्रांची चांगली साथ लाभल्यामुळे तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल.


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीत तुमचे पैसे गुंतवू शकता. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. 


तसेच, इतर राशींसाठी देखील हा काळ महत्त्वाचा असणार आहे. मात्र, प्रामुख्याने या तीन राशींसाठी विजयादशमीचा शुभ मुहूर्त फार फायदेशीर ठरणार आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Dussehra 2024 : दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून का देतात? वाचा धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व