Dasara 2023: शारदीय नवरात्रीच्या समाप्तीनंतर दुसऱ्या दिवशी दसऱ्याचा (Dasara) सण मोठ्या थाटात साजरा केला जातो, याला विजयादशमी असंही म्हणतात. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या दिवसाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता, त्यामुळे या दिवशी रावण दहनही केलं जातं, यासोबत या दिवशी शस्त्रांची पूजाही केली जाते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात. 


या दिवशी धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते, त्याचं प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्याची पानं, पाटी-पुस्तक अर्थात सरस्वती देवी आणि शस्त्रास्त्रांचं पूजन केलं जातं. पण या सर्वात तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का, की दसऱ्याला आपट्याचीच पानं सोनं म्हणून का दिली जातात? जाणून घेऊया.


दसऱ्याला का वाटली जातात आपट्याची पानं?


पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रं शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. त्यापैकी धनुष्य आणि काही बाण अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही दसऱ्याच्याच दिवशी.


धार्मिक शास्त्रात म्हटलं गेलं आहे की, शमीच्या झाडामध्ये कुबेर देव, वृक्षात धनाची देवता वास करते. त्यामुळे शमीच्या झाडाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. तसंच उत्पन्न, आनंद आणि वय वाढतं. यासाठी लोक दर शनिवारी शमीच्या झाडाची पूजा करतात. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची पानं म्हणजेच शमीच्या पानांचं वाटप केल्याने सुख, समृद्धी वाढते. या दिवशी सीमोल्लंघन, शमी पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्र पूजा ही चार कृत्यं करायची असतात.


आपट्याच्या पानांचं धार्मिक महत्त्व


आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा (Bauhinia racemosa) आहे. दसर्‍याच्या दिवशी शमीची पानं आपल्या घरात ठेवावीत. यामुळे घरातील हवा शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. या आपट्याच्या पानांची देवाणघेवाण होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होतात.


आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आहे. आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जातो. मुतखडा विकारात औषधामध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. याची पानं कफ आणि पित्त दोषांवर देखील गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.


हेही वाचा:


Dasara 2023: दसऱ्याच्या दिवशी करा 'हे' उपाय; आर्थिक समस्या होतील दूर, समृद्धीही नांदेल