Money Plant, Vastu Tips : वास्तुशास्त्रात मनी प्लांटचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. घरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, असे म्हटले जाते. मनी प्लांट असणाऱ्या घरात सुख-समृद्धी नांदते. व्यवसायात नफा होतो. म्हणूनच लोक त्यांच्या कार्यालयात आणि दुकानात मनी प्लांट ठेवतात. पण, अशा वेळी मनी प्लांटशी संबंधित काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. कारण, मनी प्लांटशी संबंधित एखादी चूक देखील माणसाला कंगाल बनवू शकते. या चुकांमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब विस्कळीत होऊ शकते, असे म्हटले जाते.
मनी प्लांट ठेवण्याची दिशा जाणून घ्या : सुख, समृद्धी आणि संपत्ती प्राप्तीसाठी मनी प्लांट योग्य दिशेने ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या रोपाला चुकीच्या दिशेला लावल्यास घरात समृद्धी येण्याऐवजी गरिबी येते. त्यामुळे मनी प्लांट लावताना घराची उत्तर-पूर्व दिशा चुकुनही निवडू नका. ईशान्य दिशेला मनी प्लांट ठेवल्याने माणूस कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातो, असे म्हणतात. मनी प्लांट ठेवण्याची योग्य दिशा दक्षिण-पूर्व दिशेला आहे.
मनी प्लांटला वरच्या दिशेने वाढू द्या : मनी प्लांट ही अतिशय वेगाने वाढणारी वनस्पती आहे. त्यामुळे त्याच्या जवळ दोरी किंवा काठी ठेवावी म्हणजे हे वेल काठी किंवा दोरीच्या साहाय्याने वरती वाढते. यामुळे घराची वाढ नेहमीच वरच्या दिशेने राहते, असे म्हटले जाते.
सुकलेला भाग कापून टाका : वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सुकलेले मनी प्लांट ठेवणे अशुभ मानला जाते. मनी प्लांट सुकल्याने घराची आर्थिक स्थिती बिकट होते, असे म्हणतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे मनी प्लांटची पाने सुकायला लागली की, त्याचा सुकलेला भाग कापून टाकावा.
मनी प्लांट घराच्या आत ठेवा : मनी प्लांट घराच्या आतमध्ये ठेवणे नेहमीच शुभ मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या बाहेर ठेवणे अशुभ मानले जाते. या वनस्पतीच्या वाढीला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही, त्यामुळे ती घराच्या आतील बाजूसही बहरते.
भेटवस्तू म्हणून चुकुनही देऊ नका : मनी प्लांटचा रोप चुकुनही कुणाला भेट म्हणून देऊ नये. असे केल्याने शुक्र क्रोधित होतो, असे म्हणतात. कारण शुक्र ग्रह हा सुख, शांती आणि संपत्तीचा ग्रह आहे. त्याच्या नाराजीमुळे आर्थिक स्थिती कमकुवत होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :