Maharashtra Politics मुंबई : अडथळ्याचा टप्पा पार केल्यानंतर अखेर आज पुण्यातील मेट्रोचं (Pune Metro inaugurate) आज रविवारी (29 सप्टेंबर) लोकार्पण होत आहे. पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट पर्यंतच्या  भूमिगत मेट्रोचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते होणार आहे. ऑनलाईन पध्दतीने हे उद्घाटन करण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. केंद्राच्या पातळीवर वरिष्ठ नेत्यांबरोबर गुरुवारी दिवसभर चर्चा झाल्यानंतर आज (रविवारी) पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने होकार कळवला असून आज ऑनलाईन माध्यमातून हे उद्घाटन आज होणार आहे.


दरम्यान, याच मेट्रोच्या उद्घाटनांचा कार्यक्रम  26 सप्टेंबर रोजी निश्चित झाला होता. मात्र पुण्यातील मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाला होता. दरम्यान या सोहळ्यावरून (Pune Metro inaugurate) महाविकास आघडीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनही केलं होतं. एकुणात आज पुण्यातील मेट्रोला हिरवा कंदील मिळाला असून ती लवकरच पुणेकरांच्या सेवेत असणार आहे. मात्र याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी परत एकदा निशाणा साधत पंतप्रधानांवर टीका केली आहे. 


मेट्रोचं ६ वेळा उद्घाटन करणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच


यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, मेट्रोचं ६ वेळा उद्घाटन करणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहे. लाडकी बहीण योजना हा मोठा भ्रष्टाचार आहे, हे स्वत: पंतप्रधान मोदी म्हणत आहेत. अर्थखात्यात पैसा नाही, तिजोरीत खडखडाट आहे. ईडीही भाजपची कलेक्शन आहे. भाजपच्या खात्यात जाणारे पैसे हे ईडीच्या माध्यमातून जातात. ईडीही खंडणीखोर संस्था आहे.  ईडीला टार्गेट दिलं जात आहे. नेत्यांना पकडा आणि वसूली करा. येडीयुरप्पा यांच्या विरोधात इतके आरोप होतात ते अजूनही मोकाट आहेत. सोबतच, जितू नवलनी याच्या बाबात आम्ही पुरावे दिले. तो कसा ईडीसाठी काम करत होता आम्ही त्यासाठी चौकशी नेमली होती.  मात्र, फडणवीस सरकार येताच सर्व काही बंद केलं. रोमी भगत यांनी तर भारतात दुकान थाटलं होतं, आता ते तुरूगांत आहे. असे आरोप करत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  


मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळावा हा अहमदाबादला घेतला पाहिजे- संजय राऊत 


दरम्यान, आगामी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा हा अहमदाबादला घेतला पाहिजे, त्यांचा पक्ष गुजरातवरून चालतो, गुजरातला अदानींच्या जागेवर घेऊन अदाणी मोदी शहा यांना प्रवक्ता म्हणून त्यांनी बोलवायला हवं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.


हे ही वाचा