Diwali 2022 : येत्या 24 ऑक्टोबरपासून दिपावळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या कालावधील देशभरातील प्रत्येक घरी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते.  असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि प्रत्येक घरात संचार करते. त्यामुळेच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक विविध उपाय करतात. असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी केलेल्या या उपायांमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते.   


दिवाळीत करा महत्वाची ही कामे


दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा करून तिचा आशीर्वाद मिळवा. मता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विवाहित स्त्रीला आपल्या घरी बोलावून तिला भोजन द्या. त्यांना मिठाई देखील अर्पण करा. तुम्ही त्यांना लाल रंगाचे कपडेही भेट देऊ शकता. दिवाळीच्या दिवशी हा उपाय केल्याने मात लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते.  
 
दिवाळीला घरी लक्ष्मी आणि गणपतीची विधिवत पूजा करून लक्ष्मीला हरभरा डाळ अर्पण करा. पूजा संपल्यानंतर ती डाळ पिंपळाच्या झाडावर अर्पण करावी. असे केल्याने मााता लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. 


दिवाळीच्या दिवशी तिजोरीत ठेवलेले दागिने आणि पैसा लाल कपड्यात बांधून उत्तर-पूर्व दिशेला ठेवा. असे म्हटले जाते की या दिवशी असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.


दिवाळीच्या दिवशी भाकरी बनवून त्याचे चार भाग करा. त्यातील पहिला भाग गायीला, दुसरा भाग कुत्र्याला, तिसरा भाग कावळ्याला आणि शेवटचा भाग एका चौरस्त्यावर ठेवा. म्हणजे ज्या ठिकीणी चार रस्ते एकत्र येत आहेत अशा रस्त्यावर. असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या