Madhurima Raje Chhatrapati Net Worth :

  राज्यात काँग्रेसला तीन ठिकाणी दिलेल्या उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश होता. कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र काँग्रेसमध्येच प्रचंड असंतोष उफाळून आला. थेट काँग्रेस कमिटीवर हल्ला झाल्याने अवघ्या काही तासांमध्येच राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवल्यानंतर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. काल (29 ऑक्टोबर) मंगळवारी प्रचंड शक्तीप्रदर्शनाने काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये करवीरचे राहुल पाटील, कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती आणि कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 


मधुरिमाराजे छत्रपती किती कोटींच्या मालकीण?


दरम्यान मधुरिमाराजे छत्रपती यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये 7 कोटी 90 लाख 275 रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे असल्याचं म्हटलं आहे. मधुरिमाराजे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार त्यांच्याकडे रोख 58 हजार रुपये आहेत. विविध बँकांमध्ये 36 लाख 86 हजार 209 रुपयांच्या ठेवी आहेत. माजी आमदार मालोजीराजे यांच्या नावे विविध बँकांमध्ये एक कोटी 21 लाख 56 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मधुरिमाराजे यांनी 7 लाख 90 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे  9 लाख 50 हजार रुपयांची गाडी आहे. 719 ग्रॅम सोनं असून आजच्या बाजारभावाने त्याची किंमत 77 लाख सहा हजार रुपये इतकी आहे.


पती मालोजीराजे यांच्याकडे एक कोटी 47 लाख 56 हजार रुपयांचे सोने आहे. याशिवाय स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक 58 लाख 99 हजार इतकी आहे. मालोजीराजे यांची 8 कोटी 58 लाख 44 हजारांची मालमत्ता आहे. मालोजीराजे यांच्याकडे एकूण 14 कोटी 14 लाख 61 हजार रुपयांची संपत्ती आहे. मुलगी यशस्विनीराजे यांच्याकडे दोन कोटी चार लाख 23 हजार 593, यशराजराजे यांच्याकडे तीन कोटी दोन लाख 23 हजार 593 रुपयांची मालमत्ता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या