Diwali 2024 : दिवाळी (Diwali 2024) हा सण अंधारावर उजेडाचं प्रतीक मानला जातो. अश्विन कृष्ण पक्षातील तिथीला दिवाळीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान गणेशाची आणि लक्ष्मीची पूजा करतात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दिवाळीत धनत्रयोदशी आणि पाडव्याला नवीन घर, वाहन खरेदी करणं शुभ मानलं जातं. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. त्यामुळे यंदा वाहन दिवाळीला खरेदी करावं की धनत्रयोदशीला? वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त नेमका काय असणार आहे ते जाणून घेऊयात.
धनत्रयोदशी 2024 (Dhanteras 2024)
दिवाळीच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून सुरु होते. त्यानुसार, यावर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरी देव अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. असं म्हणतात की, जी व्यक्ती या दिवशी खरेदी करते त्यांच्या घरात धन-संपत्ती, धान्यात चांगली वाढ होते. तसेच, धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा पाडव्याला अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात. त्यामुळे यंदा वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊयात.
दिवाळी पाडवा 2024 (Diwali Padwa 2024)
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपेकी अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवविवाहीत दाम्पत्य एकमेकांना पाडव्यानिमित्त भेटवस्तू देतात. तसेच, या दिवशी नवीन घर, वाहन, दागिने, वस्तू खरेदी करण्याची परंपरा देखील वर्षानुवर्ष चालत आलेली आहे.
वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त
धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कधीही कार खरेदी करु शकता. यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 31 मिनिटांपासून ते 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 01 वाजून 15 मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळात तुम्ही वाहन खरेदी करु शकता.
चर (सामान्य) - सकाळी 09.18 पासून सकाळी 10.41
लाभ (उन्नती) - सकाळी 10.41 पासून दुपारी 12.05
अमृत (सर्वोत्तम) - दुपारी 12.05 पासून दुपारी 01.28
लाभ (उन्नती) - रात्री 7.15 पासून ते रात्री 08.51
31 ऑक्टोबरला वाहन खरेदीचा शुभ मुहूर्त
शुभ (उत्तम) - दुपारी 04.13 ते संध्याकाळी 05.36
अमृत (सर्वोत्तम) - संध्याकाळी 05.36 ते रात्री 07.14
चर (सामान्य) - रात्री 07.14 ते रात्री 08.51
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: