Diwali 2024 : हिंदू धर्मात दिवाळीचा (Diwali) सण फार महत्त्वाचा आणि खास मानला जातो. असं म्हणतात की, या दिवशी देवी लक्ष्मीची (Lord Lakshmi) आराधना करणं फार लाभदायक ठरते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. दिवाळी जसा आनंदाचा, उत्साहाचा सण आहे. दिवाळीत ज्याप्रमाणे घरात फराळ केला जातो. दिव्यांची आकर्षक रोषणाई केली जाते त्याप्रमाणेच घराची साफसफाई देखील तितकीच महत्त्वाची आहे.
पण, दिवाळीत फक्त घराची साफसफाई करणंच महत्त्वाचं नाहीये तर घरातील ठराविक वस्तूंच्या असण्याने देखील देवी लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या दिवाळीच्या साफसफाई आधीच घरातून बाहेर काढणं गरजेचं आहे ते जाणून घेऊयात.
जुन्या चपला-बूटं
अनेकांना आपल्या घरात जुनं सामान ठेवायला फार आवडतं. पण, ही चांगली सवय नाही. असं म्हणता की, आपल्या घरातून जुन्या चपला, बूटं दिवाळीच्या साफसफाई आधीच घरातून बाहेर काढाव्यात. यामुळे घरातून दारिद्र्य निघून जाते आणि संख-संपत्तीत चांगली वाढ होते.
तडा गेलेला आरसा
तडा गेलेला आरसा किंवा तडा गेलेली वस्तू नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जाते. असं म्हणतात की, तुटलेली काच जर तुम्हाला घरात कुठे सापडली तर ती बाहेर फेकून द्यावी. सर्वात जास्त नकारात्मकता ही तुटलेल्या काचा आणि आरशातून पसरते. त्यामुळे घरात लक्ष्मीचा वावर होत नाही.
जुन्या मूर्ती
आपल्यापैकी अनेकजण असे आहेत जे घरातल्या जुन्या वस्तू किंवा तुटलेल्या मूर्ती विसर्जित करण्यापेक्षा त्या घरीच सांभाळून ठेवतात. मात्र, हे करणं फार चुकीचं आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो आणि घरात अडचणी वाढतात.
जुनं कपाट
प्रत्येक घरातील कपाट ही अशी वस्तू आहे जिथे सर्वात जास्त पसारा असतो. अशा वेळी तुमच्या घरातील जुनं कपाटात, कपाटातील जुन्या वस्तू आणि नको असलेलं सामान वेळीच फेका. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :