Diwali 2022 : दिवाळीतील भाऊबीज या सणाला अत्यंत महत्व आहे. भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळक लावते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. बहिणीकडून भावाला ओवाळले जाते. त्यानंतर भावाकडून बहिणीला खास अशी भेटवस्तू दिली जाते. यंदा 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीज हा सण साजरा केला होणार आहे.
भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता अशी अख्यायिका आहे. यमराज आपल्या भहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेऊ घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेली प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले. यावेली यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये. शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही. यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले. याचा दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे सांगितले जाते. त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया देखील म्हटले जाते.
यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते
भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. कारण असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून भय नसते अशी श्रद्धा आहे.
शुभ मुहूर्त
या वर्षी 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे. या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त 2 तास 15 मिनिटांचा आहे. हा शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 18 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल. याच वेळेत भाऊबीज सण साजरा करावा असे सांगितले गेले आहे.