Dhanteras 2024 Date : दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशीला (Dhanteras 2024) सुरुवात होते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करतात, समृद्धी आणि सुख-संपत्तीसाठी प्रार्थना करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेकजण सोन्याचे दागिने, चांदीची नाणी यासह अनेक नवीन वस्तू खरेदी करतात.
यंदा दिवाळी काहीशी लवकर सुरू होत आहे, त्यामुळे दिवाळीच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होते, तर यंदा धनत्रयोदशी नेमकी कधी? या दिवशी धन पूजनाचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? जाणून घेऊया.
यंदा धनत्रयोदशी नेमकी कधी? (Dhanteras 2024 Date)
या वर्षी धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 रोजी, म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे.
धनत्रयोदशी तिथी (Dhanteras 2024 Tithi)
धनत्रयोदशी तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजून 31 मिनिटांपासून होईल. ते धनत्रयोदशीची समाप्ती 30 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे. मात्र उदयतिथीनुसार, धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाईल.
धनत्रयोदशी पूजा शुभ मुहूर्त (Dhanteras 2024 Shubh Muhurta)
धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो. पंचांगानुसार, यंदा पूजेचा शुभ मुहूर्त 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:04 ते 8:27 पर्यंत असेल, अशात तुम्हाला पूजा करण्यासाठी सुमारे 1 तास 23 मिनिटांचा वेळ मिळेल.
प्रदोष काळ: संध्याकाळी 6:01 वाजेपासून ते रात्री 8:27 पर्यंत
वृषभ काळ: संध्याकाळी 7:04 ते रात्री 9:08 पर्यंत
त्रयोदशी तिथी प्रारंभ: 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:31 पर्यंत
त्रयोदशी तिथी समाप्त: 30 ऑक्टोबर 2024 दुपारी 1:15 पर्यंत
धनत्रयोदशी पूजा विधी (Dhanteras Puja Vidhi)
धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी पाटावर देवी लक्ष्मी आणि कुबेराचा फोटो ठेवावा. कुबेर देव आणि धन्वंतरि देवाची पूजा करावी. नंतर तुपाचा दिवा लावावा आणि संध्याकाळी दाराजवळ दिवे लावावे. घरातील दागदागिने, पैसे तिजोरीतून बाहेर काढून त्याची पूजा करावी आणि पुन्हा तिजोरीत ठेवून द्यावे. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाला पिवळी मिठाई अर्पण करा. यानंतर मंत्रोच्चार करुन आरती करा. धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या कपड्यांची आणि दागिन्यांची खरेदी करणं शुभ समजलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: