Clove Benefits : ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थिती आणि दिशेचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यांचा वापर करून ग्रहांना शांत केले जाऊ शकते. यामध्ये स्वयंपाकघरातील लवंग (Clove) ही फक्त तुमच्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर लवंगाशी संबंधित अनेक ज्योतिषी उपाय देखील विशेष फायद्याचे आहेत. धनलाभ, संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी लवंग अतिशय उपयुक्त मानले जाते. लवंगाशी संबंधित नेमके फायदे आणि उपाय आहेत ते जाणून घ्या.


लवंगाचे काही चमत्कारित उपाय : 



  • राहू-केतूचा वाईट प्रभाव लवंगाच्या मदतीने कमी किंवा दूर करता येतो. जर तुमच्या कुंडलीत राहू-केतूचा दोष असेल तर दर शनिवारी तुम्ही लवंगाचे दान करा. याशिवाय शिवलिंगावर लवंगही अर्पण करू शकता. तुम्ही असे सतत 40 दिवस केले तर तुमच्या जीवनातील सर्व वाईट प्रभाव नाहीसे होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.

  • जर तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर लक्षात ठेवा घरातून बाहेर पडताना दोन लवंगा तोंडात ठेवा. आणि कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर तोंडातून काही लवंगांचे तुकडे फेकून द्या. तुमच्या कार्यात यश मिळावे यासाठी तुमच्या देवाचे नामस्मरण करून प्रार्थना करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शकते.

  • खूप मेहनत करूनही तुमचे कोणतेही काम पूर्ण होत नसेल किंवा केलेल्या कामात यश मिळत नसेल तर मंगळवारी हनुमानाच्या मूर्तीसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. या दिव्यात दोन लवंगा टाका आणि त्यानंतर हनुमान चालीसा वाचून आरती करा. असे 21 मंगळवार सतत केल्याने तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल.

  • घरामध्ये आर्थिक संकट असल्यास लक्ष्मी देवीला पूजेत गुलाबाच्या फुलांसह दोन लवंगा अर्पण करा. याशिवाय लाल कपड्यात 5 लवंगा बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात पैसा येतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या