Christmas 2024 Wishes In Marathi: यंदाचा नाताळ हा खास असणार आहे. सध्या भारतासह विविध देशात ख्रिसमससह नववर्षाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरूय. ज्या लोकांना आपल्या नातेवाईकांना, किंवा मित्रपरिवाराला भेटता येत नाहीत, ते या दिवशी खास शुभेच्छा, शुभ संदेश एकमेकांना देतात. या संदेशांमध्ये आनंद, शांती, प्रेम आणि आशीर्वाद यासारख्या भावना व्यक्त केल्या जातात. तुम्हालाही तुमच्या नातेवाईकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर या शुभेच्छा इथे वाचा. आपल्या प्रियजनांना नाताळच्या शुभेच्छा देण्याची ही सर्वात सुवर्ण संधी आहे.
सर्व धर्मातील लोक हा दिवस साजरा करतात
ख्रिसमस डे दरवर्षी 25 डिसेंबर रोजी भारत आणि जगभरात मोठ्या धूम धडाक्यात साजरा केला जातो. असे म्हटले जाते की येशु ख्रिस्त या पवित्र दिवशी जन्माला आले होते. या कारणास्तव, हा दिवस खूप मोठ्या जलौषात साजरा केला जातो. ख्रिसमस चा हा दिवस फक्त ख्रिश्चन समुदायाचे च लोक साजरे नाही करत तर सर्व धर्मातील लोक हा दिवस साजरा करतात. या दिवशी सर्वजण एकमेकांना नाताळच्या असे शुभेच्छा देतात. या दिवसाची सर्व लहान मुले आतुरतेने वाट बघत असतात कारण या दिवशी सांताक्लॉज त्यांना छान छान भेटवस्तू देतो.
यंदाचा क्रिसमस आणि येणारे नवीन वर्ष,तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रभूची कृपादृष्टीआपल्यावर नेहमी राहो..आपल्या जीवनात प्रेम,सुख आणि समृद्धी येवो..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!
नाताळच्या शुभ क्षणी..आपली सारी स्वप्न साकार व्हावी..नाताळची पहाट..तुमच्यासाठी अनमोल आठवण ठरावी..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला,विनंती आमची येशूलासौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..Merry Christmas!
आला नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,मनात धरूया आशा, सर्व सुखी राहू दे,प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
गरिबांना मदत करून भेटवस्तू द्यात्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरीलस्मित पाहून ख्रिसमस बनवा खास,नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
ख्रिसमस माझ्यासाठी ती वेळ आहेजेव्हा माझ्या जवळच्यांनामी सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्यासाठीकिती खास आहेत. माझ्या सर्वफ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा...
तुमचा ख्रिसमस आनंदाचा आणिसमाधानाचा जाओ.मेरी ख्रिसमस.
होउदे तुमच्यावर सुखाची उधळण!तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांनाख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!
तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवणख्रिसमसला हमखास येते. आपणएकत्र घालवलेला काळ आठवतो आणिपुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येकदिवस जणू ख्रिसमस आहे. या सणालामी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे.माझ्या स्पेशल फॅमिलीलाख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा...
ना कार्ड पाठवत आहे, ना फूल पाठवत आहे.फक्त खऱ्या मनाने ख्रिसमस आणिनववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा...
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणियश घेऊन येवो. तुमच्या मनातल्यासर्व इच्छा तो पूर्ण करो.नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
नाताळ आपणां सर्वांसाठी आनंद घेऊन येवोअक्षय्य सुखाची अमुल्य भेट…आपणां सर्वांनानाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबतअसण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना यासुट्ट्या छान घालवता येवोत आणिनववर्षही छान जाओ.मेरी ख्रिसमस...
देवाकडे काय मागू तुझ्यासाठी,तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहोहीच माझी मागणीमेरी ख्रिसमस.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांनाख्रिसमस आणिनववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
चेहऱ्यावर आनंद, सगळं सौख्यसगळ्या स्वप्नांची पूर्तता,यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्यआपल्याला मिळू देनाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमसब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांनाख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्याकडून आपणांस व आपल्यागोड परिवारास ख्रिसमस सणाच्याहार्दिक शुभेच्छा..
जे सदमार्गावर चालतात,परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतातख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
या ख्रिसमसच्या दिवशी आपल्या सर्वइच्छा आकांशा पूर्ण होवोहि सदिच्छा आणिनाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.
रोजचेच तरी भासेनवा सहवाससोन्यासारखा लोकांसाठीआजचा दिवस हा खासमेरी ख्रिसमस!
हेही वाचा>>>
Christmas Cake Recipe: ख्रिसमसच्या दिवशी असेल प्रेमाचा गोडवा! घरीच बनवा 'हे' 3 प्रकारचे केक, पार्टीत होईल तुमचं खूप कौतुक
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )