Chaturgrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्राला नवग्रहांमध्ये सर्वात जलद गतीने चालणारा ग्रह मानतात. चंद्र ग्रह एका राशीत जवळपास अडीच दिवसापर्यंत स्थित असतात. त्यामुळे चंद्राच्या स्थितीत झालेला बदल कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती किंवा दृष्टी दिसून येते. यामुळे अनेक शुभ अशुभ राजयोग निर्माण होतात. नोव्हेंबर (November) महिना काही राशींच्या लोकांसाठी फार खास असणार आहे. कारण या काळात अनेक मोठ मोठे राजयोग निर्माण होणार आहेत. सध्या मंगळ ग्रह सूर्य, आणि बुध ग्रह वृश्चिक राशीत विराजमान आहेत. यामुळे त्रिग्रहीसह मंगळ आदित्य, बुधादित्यसह रुचक राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 20 नोव्हेंबर 2025 रोजी चंद्र सकाळी 4 वाजून 13 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मंगळ, बुध आणि सूर्यासह युती करुन शक्तिशाली चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. त्याचबरोबर मंगळ ग्रहाबरोबर चंद्र महालक्ष्मी, सूर्यासह शशि आदित्य योग, बुध-चंद्र योगसुद्धा निर्माण करणार आहे. त्यामुळे 12 राशींसह याचा परिणाम देशभरात पाहायला मिळणार आहे. मात्र, या काळात तीन राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी चतुर्ग्रही योग फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या कुंडलीतील लग्न भावात सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्राबरोबर युती होणार आहे. त्याचबरोबर कर्क राशीत गुरुची दृष्टी मंगळ आणि चंद्रावर पडणार आहे. या कालावधीत तुम्ही तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करु शकता. तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या जीवनात आनंद टिकून राहील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लग्न भावात गुरु शुक्र ग्रह विराजमान होऊन मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. त्याचबरोबर, दहाव्या स्थानी बृहस्पती हस महापुरुष राजयोग निर्माण करणार आहे. या राशीच्या दुसऱ्या चरणात चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास या काळात वाढेल. तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळीच पूर्ण करता येतील. तसेच, अचानक धनलाभाचाही संकेत तुम्हाला मिळणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या कुंडलीतील सातव्या चरणात चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. तुमच्या जीवनात आनंद टिकून राहील. तसेच, घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं दिसेल. करिअरमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील. जोडीदाराचा तुम्हाला चांगला सहवास लाभेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)