Chandra Grahan 2022 : पंचांगानुसार  2022 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी होईल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी 2:41 वाजता सुरू होईल आणि 06:20 वाजता संपेल. त्याचा मोक्ष कालावधी 07:25 वाजता असेल. हे चंद्रग्रहण भारतात संध्याकाळी 5.20 पासून चंद्रोदयासह दिसेल आणि 6.20 वाजता चंद्रास्तासह समाप्त होईल. त्याचा सुतक काळ भारतात वैध असेल. या चंद्रग्रहणाचा या राशींवर अशुभ प्रभाव पडेल.

  


या राशींवर होणार प्रभाव


मेष : मेष राशीचा अधिपती मंगळ आहे. या लोकांवर या चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव पडतो . अनेक प्रकारची अज्ञात भीती त्यांच्या आत राहील. आर्थिक स्थिती चांगली राहणार नाही.


वृषभ : या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाच्या दुष्परिणामांमुळे या लोकांच्या जीवनात अचानक मोठे संकट येऊ शकते आणि धनहानी होऊ शकते .


सिंह : चंद्रग्रहणामुळे त्यांच्या मान-सन्मानावर संकट येऊ शकते. त्यामुळे त्यांना अपमानित व्हावे लागेल, असे कोणतेही कृत्य त्यांनी टाळावे.


कन्या : चंद्रग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. ते पैसे गमावू शकतात.


तूळ : तूळ राशी ज्याचा अधिपती ग्रह शुक्र आहे. या चंद्रग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे त्यांना कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत त्यांनी धीर धरायला हवा.


धनु : या चंद्रग्रहणामुळे या राशीच्या लोकांची चिंता वाढेल आणि त्यांना भविष्यात नको असलेल्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


मकर : 8 नोव्हेंबर रोजी होणारे हे चंद्रग्रहण या राशीच्या लोकांना त्रास आणि अनेक प्रकारचे दुःख देऊ शकते . चंद्रग्रहण काळात त्यांनी घराबाहेर पडू नये.


मीन : या चंद्रग्रहणामुळे त्यांना धनहानीसह अचानक मोठे नुकसान होऊ शकते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहणात बनतोय अशुभ योग, गर्भवती महिलांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा