Chandra Grahan 2021 November: वर्षातील शेवटचं आणि 580 वर्षानंतरचं सर्वात मोठं चंद्रग्रहण उद्या (शुक्रवार, 19 नोव्हेंबर) होणार आहे. भारतासह जगभरातील अनेक देशातून हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल. इ.स. पंधराव्या शतकानंतरच हे सर्वात मोठं चंद्रग्रहण असणार आहे, अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आलीय. पृथ्वीपासून चंद्राचं अंतर जास्त असल्यानं उद्याच्या चंद्रग्रहणाचा कालावधी जास्त असेल. याआधी 18 फेब्रुवारी 1440 रोजी इतकं मोठं चंद्रग्रहण  होतं. हे ग्रहण कुठे, कसे आणि कधी पाहता येईल? तसेच या चंद्रग्रहणादरम्यान कोणकोणत्या राशींचं भाग्य उजळणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


हिंदू दिनदर्शिकेच्या तारखेनुसार, आंशिक चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेच्या शुक्ल पक्ष (19 नोव्हेंबर) रोजी सकाळी 11 वाजून 34 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, संध्याकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी संपेल. कारण, चंद्राचा 97 टक्के भाग पृथ्वीच्या सावलीनं व्यापलेला असेल. हे चंद्रग्रहण भारतातील मणिपूरच्या इम्फाळ आणि आजूबाजुच्या परिसरात काही काळ दिसणार आहे. आसाम, अरुणाचल प्रदेशातही हे ग्रहण दिसेल. आंशिक चंद्रग्रहण भारतासह अमेरिका ऑस्ट्रेलिया, युरोप आणि आशियातील काही भागात दिसणार आहे. तज्ज्ञांच्या मते, हे चंद्रग्रहण बहुतेक युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर/पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर यासह जगातील अनेक भागांमध्ये दिसेल.


चंद्रग्रहणात 'या' राशींवर होणार परिणाम- 


मेष: आर्थिक फायदा होईल, अडकलेला पैसा मिळू शकतो.
वृषभ: धनहानीमुळे त्रास वाढू शकतो आणि शारीरिक त्रासही होण्याची शक्यता आहे.
मिथुन: ग्रहण काळात बाहेर जाणे टाळावं, अपघात होऊ शक्यता आहे.
कर्क: अनावश्यक खर्च करू नये, पैशांची उधळपट्टी थांबवावी. यामुळं धनहानी होण्याची शक्यता आहे.
सिंह: चांगल्या बातमीसह लाभ आणि प्रगतीचा योग लाभण्याची शक्यता आहे.
कन्या: आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांचा त्रास वाढू शकतो. शांत राहा.
तूळ: चिंतेसह मुलांकडून त्रास मिळण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या संपर्कात राहा.
वृश्चिक: प्रदीर्घ काळ सुरू असलेला त्रास आणि आर्थिक संकटातून दिलासा मिळेल.
धनु: विवाह जुळण्याची शक्यता आहे.
मकर: तुम्ही आधीच आजारी असाल तर आजार वाढण्याची शक्यता आहे.
कुंभ: घरात पाहुण्यांच्या आगमनामुळं अधिक खर्च होईल.
मीन: अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कामातील अडचणी दूर होतील. नवीन योजना करा


टीप: एबीपी माझा वरील माहितीची पुष्टी करत नाही. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-