Moon Transit Effect 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, काही ग्रह दर महिन्याला त्यांच्या निश्चित वेळेवर संक्रमण करतात. सर्व ग्रहांपैकी चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र देवाचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होण्यासाठी अडीच दिवस लागतात. सध्या चंद्र वृश्चिक राशीत आज (9 जानेवारी) रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल. 11 जानेवारीपर्यंत चंद्र देव या राशीत राहील, यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल. या काळात 3 राशीच्या (Zodiac Signs) लोकांना विशेष लाभ होणार आहे. 


वर्षातील पहिली मासिक शिवरात्री देखील आज, म्हणजेच 9 जानेवारीला आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्रीचं व्रत केलं जातं. ही तिथी भगवान शिवाला समर्पित आहे. हा दिवस महादेव आणि माता पार्वतीच्या पूजेचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पौष महिन्यातील मासिक शिवरात्रीला, म्हणजेच आज चंद्र देव देखील राशी बदलणार आहे. चंद्राच्या या चालीचा 3 राशींच्या लोकांच्या जीवनावर विशेष प्रभाव पडेल. करिअर आणि व्यवसायात लोकांना त्यांच्या इच्छेनुसार यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या 3 राशींबद्दल जाणून घ्या. 


वृश्चिक रास (Scorpio)


ज्योतिष शास्त्रानुसार, या राशीच्या धन गृहात चंद्राचं स्थान असेल. त्यामुळे चंद्राच्या या चालीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांचं उत्पन्न वाढेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय करिअर आणि व्यवसायातही तुम्हाला अमाप यश मिळेल. चंद्राच्या राशी बदलामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. 


मकर रास (Capricorn)


चंद्राच्या राशी बदलाचा फायदा मकर राशीच्या लोकांना होईल. या दिवसांत मकर राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल. या 2 दिवसांत मकर राशीच्या लोकांच्या मनातील गोष्टी पूर्ण होताना दिसतील. तुम्हाला प्रलंबित पैसे परत मिळतील. एकंदरीत 9 जानेवारी ते 11 जानेवारी हा काळ तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. 


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठीही हा काळ चांगला राहील. चंद्राच्या मार्गक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. या काळात तुम्हाला एखादा प्रवास करावा लागू शकतो, तुम्ही नवीन ठिकाणी सहलीला जाऊ शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Mahashivratri 2024 Date : नवीन वर्षात महाशिवरात्री कधी? तारीख, पूजा मुहूर्त आणि विधी जाणून घ्या