Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. ते शिक्षक आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत चाणक्यांनी (Chanakya Niti) महत्त्वाची भूमिका बजावली. आचार्य चाणक्य यांनी आपल्या अनुभवातून "अर्थशास्त्र", "कुटनीती", "चाणक्य नीती" ही रचना केली होती. आजवर आचार्ण चाणक्य यांनी जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. त्यामध्ये मुलांच्या (Children) अशा काही सवयी आहेत ज्यांचे पालन केल्यास मुलं यशस्वी होतात हेही त्यांनी सांगितलं आह. तर, हे मार्ग किंवा या सवयी नेमक्या कोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात.
1. ध्येय नेहमी लक्षात ठेवा
चाणक्य नीतिनुसार, लहान मूल, विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय, लक्ष्य नेमकं काय आहे याबाबत त्यांना कधीच विसर पडता कामा नये. त्यांनी ते नेहमी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. तसेच, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी कठोर परिश्रम केले पाहिजेत. तरच, जीवनातील यशाचा मार्ग सुकर होईल.
2. आयुष्यात शिस्त महत्त्वाची
लहान मुलांनी आपलं जीवन शिस्तीत जगणं गरजेचं आहे. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ असावी, ज्याप्रमाणे संत नेहमी ध्यानात मग्न असतात, त्याचप्रमाणे मुलांनाही शिक्षण ग्रहण करता आलं पाहिजे.
3. ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा
चाणक्य नीतीनुसार मुलांनी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. हा काळ वाचनासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. तसेच, यावेळी वाचलेल्या गोष्टी देखील लवकर लक्षात राहतात. त्याचबरोबर आपल्याला हवी असलेली मानसिक शांतताही याच वेळी मिळते.
4. वेळेचं महत्त्व लक्षात घ्या
कोणत्या वेळी काय करावे हे मुलांनी वेळीच शिकणं फार महत्वाचं आहे, तरच यश फार लवकर आणि सहज मिळवता येते. विद्यार्थ्यांनी आपलं काम वेळेत पूर्ण केलं तर यशाची उंची लवकर गाठता येते.
5. संतुलित आहार घ्या
विद्यार्थ्यांनी नेहमी पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा.यामुळे शरीर निरोगी आणि सुदृढ राहतं. यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं निरोगी शरीर हे नेहमी लक्षात ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :