Chanakya Niti: आचार्य चाणक्यांची धोरणे आणि विचार कठोर असू शकतात, परंतु जर तुम्ही त्यांची जीवनात अंमलबजावणी केली तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आचार्य चाणक्य तुम्हाला जीवनातील सर्व अडचणींमधून सहज बाहेर काढू शकतात, तुम्हाला फक्त तुमचे कार्य करत राहायचे आहे आणि आचार्य चाणक्यांच्या धोरणांची जीवनात अंमलबजावणी करायची आहे. आज तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी सांगणार आहोत ज्यांना आपण कधीही कमी लेखू नये.
चाणक्य नीती
रोग, शत्रू, साप यांच्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. त्या पुन्हा हल्ला करू शकतात -आचार्य चाणक्य
आचार्य चाणक्य यांच्या या विधानाचा अर्थ असा आहे की, जीवनात या तीन गोष्टी कधीही हलक्यात घेऊ नयेत. एकदा का या तीन गोष्टींनी तुम्हाला ग्रासले की त्या तुमचा पाठलाग सोडत नाही. आणि जरी सोडला तरी संधी मिळताच त्या तुम्हाला पकडतात. होय, या तीन गोष्टी आहेत - रोग, शत्रू आणि साप.
आजार - माणसाच्या शरीरात एखादा आजार एकदा आला, पण जर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेतली नाही तर हा आजार तुम्हाला पुन्हा पकडतो ही फार मोठी गोष्ट आहे, त्यामुळे कधीही याला कमी लेखू नका.
शत्रू - शत्रू जरी शांत बसला असेल तरी त्याला कमकुवत समजू नका, तो पराभूत होऊन शांत बसला आहे असे समजू नका, शत्रू हल्ला करण्याची संधी शोधत असतो
साप - सापाचंही असंच आहे, जर तुम्ही एकदा सापाच्या तावडीतून सुटलात तर दुसऱ्यांदा तुमच्यावर हल्ला करणार नाही असा अजिबात विचार करू नका. साप नेहमी घात करून बसलेला असतो आणि संधी मिळताच तुम्हाला चावतो.
म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की रोग, शत्रू आणि साप यांना कधीही हलके घेऊ नये, ते तुमच्यावर केव्हा बदला घेतात हे तुम्हाला स्वतःला समजणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
- Chanakya Niti : शत्रूचा पराभव करायचा असेल तर जाणून घ्या चाणक्याच्या 'या' गोष्टी
- Chanakya Niti : 'या' लोकांजवळ पैसा थांबत नाही, कर्ज आणि पैशाच्या कमतरतेमुळे असतात त्रस्त