Chanakya Niti : चाणक्यनीतीनुसार, जिथे प्रेम असेल तिथे नात्यात बळ असते. तुमचं नातं अधिक घट्ट आणि दीर्घकाळ टिकवायचं असेल तर त्यात प्रेमाची भावना कधीही कमी होऊ देऊ नये. व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2023) निमित्त जाणून घ्या प्रेमाबद्दल चाणक्य काय म्हणतात?
चाणक्यांनी सांगितल्या प्रेमासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी
चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. चाणक्यांना आचार्य चाणक्य आणि कौटिल्य असेही म्हणतात. चाणक्यांबद्दल असे म्हटले जाते की, त्यांना शास्त्र आणि शस्त्रे या दोन्हीच्या वापराचे सखोल ज्ञान होते. त्यांना दूरदृष्टी होती. चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीती या ग्रंथात प्रत्येक विषयावर मत मांडले आहे. चाणक्यांनी प्रेमासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या आहेत, व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेम दिनाच्या विशेष प्रसंगी काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत आणि समजून घेतल्या पाहिजेत.
प्रेम हा प्रत्येक नात्याचा आधार असतो
चाणक्यनीतीत म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही नात्यात जोपर्यंत प्रेमाची भावना नसेल, अशा नात्यात आपुलकी आणि समर्पणाची भावना निर्माण होऊ शकत नाही, प्रेम असेल तरच नात्यात बळ येते. त्यामुळे नातं अधिक घट्ट आणि दीर्घकाळ टिकवायचं असेल, तर त्यात प्रेमाची भावना कधीही कमी होऊ देऊ नये.
सन्मान आणि आदर
चाणक्यांच्या मते, प्रेमासोबतच आदर आणि सन्मान देखील खूप महत्वाचे आहे. प्रत्येक नात्याचा आदर केला पाहिजे. प्रेमाच्या नात्यामध्ये कधीही आदर आणि सन्मानाची कमतरता असू नये. अहंकार आणि स्वतःला श्रेष्ठ समजण्याच्या नादात जोडीदाराला आदर देणे कधीही विसरू नये. प्रेमात अहंकार नसावा. यामुळे नाते कमकुवत होते.
विश्वासघात करू नये
चाणक्य नीतीनुसार, नातेसंबंध प्रेम आणि विश्वासावर आधारित असतात. विश्वास निर्माण करणे खूप कठीण आहे. विश्वास निर्माण व्हायला वेळ लागतो, पण तो तोडायला एक सेकंदही लागत नाही. कोणत्याही नात्याचे पावित्र्य राखण्यात विश्वास महत्त्वाची भूमिका बजावतो. नात्यात खोटेपणा तेव्हाच येतो, जेव्हा विश्वास कमी होतो. परस्पर संबंधांमध्ये खोट्याला स्थान नसावे.
रागापासून दूर राहा
चाणक्यनीतीनुसार जिथे प्रेम आहे, तिथे राग टाळावा. संयम आणि नम्रतेने क्रोधाचा नाश होऊ शकतो. क्रोधित व्यक्ती केवळ स्वतःचेच नुकसान करत नाही तर इतरांचेही नुकसान करते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Valentine Day 2023 Horoscope : या 6 राशींसाठी व्हॅलेंटाईन डे खास, मिळेल खरे प्रेम! ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय?