Chanakya Niti :  चाणक्य नीतिचा (Chanakya Niti)  वापर आजही अनेकजण करतात. वैयक्तिक आयुष्यात यश मिळवण्यासाठी या चाणक्य नीतिला अवलंब अनेकजण करतात.  पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे. अनेक वेळा मेहनत करूनही कोणत्याही कामात यश मिळत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्ञान कुठूनही घेता येते. काही प्राणी-पक्ष्यांचे गुणही माणसाला शिकता येतात. आपल्या समाजात काळ्या रंगाचा  तिरस्कार करणारे  काही कमी नाहीत.फक्त माणसाच्या नाही तर प्राण्यांना देखील हे चुकले नाही.  काळा रंगाचा कावळा, कुत्रा,मांजर दिसले की कायमच अपशकून मानला जातो.  आचार्य चाणक्य यांच्या मते, या हिणवल्या जाणाऱ्या  कावळ्याच्या (Crow) काही  गोष्टी जीवनात आत्मसात केल्या तर अपयश तुमच्या जवळपास देखील येणार आहे. 


 हिंदू धर्माशी संबंधित पौराणिक ग्रंथांमध्ये  कावळा हा मृत्यूची देवता यमराजाचा दूत मानला जातो.  सामान्यतः असे मानले जाते की कावळा बहुतेक अशुभ घटनांचे संकेत देतो. एवढचं काय कावळा शिवला किंवा कावळ्याचा स्पर्श झाला तरी अशुभ समजून अंघोळ केली जाते. पण याच रंगाने काळा आणि अशुभ मानणाऱ्या कावळ्यात काही खास गुण आहे.


कावळ्याकडून शिका या गोष्टी


विश्वास नका ठेवू 


कावळ्याकडून शिकण्यासारखा पहिला गुण म्हणजे कधीच कोणावर डोळे झारकून विश्वास ठेवू नये. आजकाल कधी कोण कोणाचा विश्वासघात करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका. त्यामुळे अगदी विश्वासू माणसाकडून देखील सावध राहायला पाहिजे


करडी नजर


सभोवतालच्या परिस्थितीवर माणसावर करडी नजर ठेवून कामे करावीत.  त्याचप्रमाणे आपली जे ध्येय आणि आपले जे उद्देश्य आहे  त्याच दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. मुख्य ध्येयावर आपली करडी नजर ठेऊन कामे करावेत. 


समाधानी राहणे 


समाधानी राहा, जीवनात जे मिळाले नाही त्याची चिंता करण्यापेक्षा किंवा उदास राहण्यापेक्षा जे मिळाले त्यात समाधानी राहणे गरजेचे आहे. 


धनसंचय करणे


तरुण वयात आपण ज्यावेळी कमावू शकतो. त्यावेळी आपल्याकडे पैसे येत असतात. त्यावेळी अनावश्यक खर्च न करता पैशांची बचत करा. कारण पडत्या काळात हाच पैसा आपल्याला मदत करतो.  जर एखाद्या व्यक्तीने आपले सर्व काम वेळेवर किंवा त्यापूर्वी पूर्ण केले तर त्याला शेवटच्या क्षणी कठोर परिश्रम आणि चिंता करावी लागणार नाही.


सतर्क राहा


कायम सतर्क राहा. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की कावळा खूप सतर्क असतो. असे म्हटले जाते की कावळा भविष्यातील घटनांचा अंदाज घेऊ शकतो. त्याचप्रमाणे माणसाने सदैव सतर्क असले पाहिजे. त्याच्या आजूबाजूला कसले वातावरण आहे हे त्याला कळायला हवे. तरच तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता.


हट्टी स्वभाव


कावळा हा अतिशय हट्टी स्वभावाचा पक्षी आहे. त्याने जे काही काम पूर्ण करायचे ठरवले आहे, तो फक्त त्याचाच विचार करतो. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीनेही आपल्या जीवनात स्वतःला जिद्दी बनवले आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Chanakya Niti : उपाशी राहिलात तरी चालेल पण बायकोला कधीच सांगू नका 'चार' गोष्टी; चाणक्य सांगतात, नाहीतर सुखी आयुष्याला लागेल नजर