Chanakya Niti For Husband:  चाणक्य नीतिचा (Chanakya Niti)  वापर आजही अनेकजण करतात. वैयक्तिक आयुष्यात यश मिळवण्यासाठी या चाणक्य नीतिला अवलंब अनेकजण करतात. आई- मुलगा, बहिण- भाऊ, बाप- लेक, पती- पत्नी आयुष्यातील कोणत्याही पाया म्हणजे विश्वास... विश्वास हा नात्याचा धागा फार नाजूक असतो. काही लोकांना वाटते की एकमेकांपासून काहीही लपवू नये, सर्व काही शेअर केले पाहिजे अन्यथा नाते कमकुवत होऊ शकते. परंतु कधी कधी काही गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवाव्यात हे आम्ही नाही तर आचार्या चाणक्य देखील सांगतात.  आचार्य चाणक्य सांगतात तुम्हाला वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. विशेषत: पुरुषांनी काही गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत आणि या गोष्टी त्यांच्या पत्नीलाही सांगू नयेत.


बायकोला कधीच सांगू नका 'या' गोष्टी 


सर्वच पडत्या बाजू सांगू नका (Weak Points)


आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, पतीने नेहमी आपले वीक पॉइंट पत्नीपासून लपवून ठेवावे. भावनेच्या ओघात देखील कधीच आपल्या वीक पॉइंटविषयी सांगू नये. जर तुम्ही तुमच्या वीक पॉइंटविषयी संगितले तर कोणत्याही भांडणात ती उल्लेख करु शकते.  त्यामुळे घरात आणि समाजात अपमानाला सामोरे जावे लागते. 


खरा पगार सांगू नका (Salary) 


तुम्हाला जोडीदारासोबत सुखी आयुष्य जगायचे असेल तर पत्नीला कधी आपल्या पगाराविषयी सांगू नये. ही गोष्ट तुम्हाला कदाचीत थोडी खटकू शकते कारण महिला या सर्वात जास्त बचत करतात. मात्र चाणक्य नीतीनुसार जर तुम्ही महिलांना तुमच्या पगाराचा खरा आकडा सांगितला तर त्या जासत खर्च करतील. विनाकारण कोणत्याही गोष्टीवर खर्च करतील. त्यामुळे गरजेच्या वेळी तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.


दान- धर्माविषयी सांगू नये (Donation)


हिंदू धर्म शास्त्रानुसार  जीवनात प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार दान केले पाहिजे आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते. दानाबद्दल आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की,  पुरुषांनी दान नेहमी गुप्त ठेवावे. दानाबद्दल बायकोलाही सांगू नये. तसेही दान हे कायम गुपत असावे. एखाद्याला दान केले तर आपल्याकडे कायम म्हटले जाते की, कोणालाच कळाले नाही पाहिजे. दानाविषयी सांगितले तर त्याचे महत्त्व कमी होते.


अपमानाविषयी कधीच सांगू नये (Insult)


पुरुषाने चुकूनही आपल्या पत्नीला आपल्या अपमानाबद्दल सांगू नये. कारण कोणतीही पत्नी आपल्या पतीचा अपमान सहन करू शकत नाही. आपल्या पतीच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय त्या शांत बसत नाही. पतीच्या  अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या सर्व मर्यादा ओलांडतील. त्यामुळे अनेकदा वाद वाढत जाऊन वाद नियंत्रणाबाहेर जातो. म्हणून, आपल्या पत्नीला अपमानाविषयी कधीच सांगू नका.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हे ही वाचा :


Chanakya Niti: गाढवाला जे उमजलं ते आपल्याला नाही कळलं; चाणक्यांनी सांगितले गाढवाकडून शिका 'या' तीन गोष्टी, अपयश कधीच येणार नाही!