Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. चाणक्यांनी (Chanakya) सांगितलेली तत्व, मूल्य आजही आपल्या आचरणात आणण्यास उपयोगी पडतात. त्यांच्या तत्त्वांचं पालन केल्याने आपल्याला चांगला उपयोग होतो. 


आपल्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, अनेकदा आपल्या हातून अशा काही चुका घडतात ज्याचा फक्त आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबियांवर देखील परिणाम होतो. यासाठी आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितीशास्त्रात (Chanakya Niti) अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजच्या काळातही आपल्याला उपयोगी पडू शकतात. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


'या' 5 गोष्टी जगापासून लपवून ठेवा...चाणक्य सांगतात


1. आपली योजना नेहमी गुप्त ठेवा :


आचार्य चाणक्य नेहमी म्हणतात की, कितीही जवळचा मित्र असला तरी मात्र, आपल्या काही गुप्त योजना असतील त्या नेहमी आपल्याकडेच ठेवा. त्या इतर कोणालाही सांगू नका. तुमची योजना जितकी गुप्त असेल तितके लक्ष्य जवळ येईल. इतरांना सांगितल्यामुळे कधी कधी या योजना पूर्णदेखील होत नाहीत.  


2. लोकांना आपली कमजोरी सांगू नका :


आचार्य चाणक्य यांनी आणखी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे, ते म्हणतात की, तुमची कमजोरी कधीच कोणाला सांगू नका. कारण लोक तुमच्या कमजोरीचा तुमच्या नकळत फायदा उचलू शकतात. आणि तुम्हाला सतत खाली पाडण्याचा प्रयत्न करतात.  


3. आपल्या अपयशाबद्दल लोकांना सांगू नका :


 आयुष्यात जर तुम्हाला कधीही अपयश आलं असेल तर त्याबद्दल कोणाशीही चर्चा करु नका किंवा कोणाला सांगू नका. कारण यामुळे लोक नेहमी तुम्हाला अपयशीच पाहतील आणि तुम्हाला संधी देणार नाहीत. 


4. तुमच्या पुढच्या मोठ्या योजनांबद्दल सांगू नका -


आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपण नेहमी अनेक योजना आखत असतो. मात्र, मित्र असो वा शत्रू तुमच्या पुढच्या योजनांबद्दल कधीच कोणाला सांगू नका. शांतपणे काम करा आणि तुमच्या यशाने लोकांना आश्चर्यचकित करा. 


5. तुमचे गुपित लोकांना सांगू नका -


कधीही काहीही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडो. मग ते सुख असो वा दु:ख. या गोष्टी कधीच कोणाला सांगू नका. काही मूर्खच फक्त आपली रहस्ये उघड करतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:   


Astrology : आज शिवयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह या 5 राशी ठरतील महाभाग्यशाली, बाबा भोलेनाथ होतील प्रसन्न