Chanakya Niti : दुस-यांना मदत करणे याला माणुसकी म्हणतात, माणुसकी तीच असते, जी वाईट प्रसंगी शत्रूला पाणी देण्यास कधीच नकार देत नाही. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीने कोणताही निर्णय हा वेळ, परिस्थिती, धर्म लक्षात घेऊनच घ्यावा. काय म्हटलंय चाणक्यनीतीत? (Chanakya Niti Marathi News)
संकटात अशा लोकांची मदत कधीच मागू नका
चाणक्य सांगतात की, संकटात अशा लोकांची मदत कधीच मागू नका, ज्यांना शत्रूपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते. चाणक्यांच्या मते, त्यांनी अशा काही लोकांचा उल्लेख केला गेला आहे. जे चांगुलपणाचा मुखवटा धारण करतात. मात्र तेच लोकं एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे वार करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. असे लोक यशात अडथळे निर्माण करतात, त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले.
स्वार्थी व्यक्ती
चाणक्य म्हणतात की, जो माणूस फक्त स्वतःच्या हिताचा विचार करतो, जो नेहमी स्वत:चा फायदा कसा होईल याचा विचार करतो, त्याने कधीही अशा लोकांची मदत घेऊ नये. कारण असे लोक स्वार्थापोटी तुम्हाला पाठिंबा देतात, परंतु त्यांचा स्वार्थ ते कधी साधून घेतील हे देखील कळणार नाही. असे लोक आपल्या स्वार्थासाठी इतरांना दुखावण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्यापासून दूर राहणे चांगले आहे, असं चाणक्य म्हणतात.
ईर्ष्या
ज्या व्यक्तीच्या मनात ईर्ष्याची भावना असते, ती माणसे स्वतःची प्रगती करत नाही, ते इतरांनाही प्रगती करू देत नाही. चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीला तुमचा हेवा वाटतो, त्याच्यासमोर वाईट काळातही हात पसरवू नका. मत्सराची आग माणसाची माणुसकी नष्ट करते. ईर्ष्यावान व्यक्ती नेहमी त्याच्या प्रतिस्पर्ध्याला अयशस्वी पाहण्याच्या शोधात असतात. असे लोक तुमच्या वाईट काळाचा फायदा घेऊन तुमची फसवणूक करू शकतात आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकतात.
मूर्खाशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च
दु:खिते सम्प्रयोगेण पंडितोऽप्यवसीदति
मदतीचे महत्त्व समजून घ्या
आचार्य चाणक्याने या श्लोकात सांगितले आहे की, लोकांना मदत करण्यापूर्वी शंभर वेळा विचार केला पाहिजे. कारण त्यांना मदत करणे देखील धोक्यापासून कमी नाही. चाणक्याच्या मते, ज्या व्यक्तीला मदतीचे महत्त्व समजते. त्यालाच मदत दिली पाहिजे. चाणक्य म्हणतात, की मूर्ख माणसाला मदत करणे तुम्हाला महागात पडू शकते, कारण मूर्खांना योग्य आणि अयोग्य समजत नाही.
अधार्मिक व्यक्ती
चाणक्याच्या मते, जो व्यक्ती धर्मापासून दूर जातो, तो पापी कृत्ये करू लागतो आणि इतरांनाही चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडतो. चाणक्य म्हणतात की, अशा लोकांच्या संपर्कात राहून त्यांना मदत केल्याने अपमानित व्हावे लागते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Chanakya Niti : लग्नाआधी 'या' 5 गोष्टींनी तुमच्या जोडीदाराला पारखून घ्या, अन्यथा लग्नानंतर पश्चातापाची वेळ येणार नाही