Chanakya Niti: हिंदू सनातन धर्मात महिलेला देवीसमान मानण्यात आले आहे. स्त्री ला शक्ति म्हटले जाते. आजही काही ठिकाणी पुरूषप्रधान संस्कृती असल्याने महिलांना समान दर्जा दिला जात नाही. काही ठिकाणी महिलांना चूल-मूल पर्यंत मर्यादित ठेवले जाते. पण तुम्हाला माहितीय का? आज आम्ही तुम्हाला स्त्रियांमधील अशा 4 गुणांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्यापुढे पुरूषही फिके पडतात. तुम्हाला माहिती आहेच की, पुरुष नेहमीच असे मानतात की ते महिलांपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत, पण तसे अजिबात नाही. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीतीत महिलांच्या अशा 4 गुणांबद्दल सांगितले आहे, ज्यामध्ये महिला पुरुषांना मागे टाकतात. जाणून घेऊया अशा 4 गुणांबद्दल..-चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात म्हटले आहे की, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त गुण असतात. नेमकं काय म्हटलंय चाणक्यनीतीत? जाणून घ्या..

आचार्य चाणक्यांची धोरणं आजच्या काळातही प्रासंगिक

जीवनात यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्य यांची तत्वे आजही अनेकजण फॉलो करतात, त्यांनी मानवी जीवनाशी संबंधित अनेक धोरणे आखली आहेत. आचार्य चाणक्य हे देशाचे एक महान तत्वज्ञानी आहेत, ज्यांचे शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेले शब्द आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. जसे ते आधीच्या काळात होते. चाणक्यानेही महिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात म्हटले आहे की, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त गुण असतात. महिला अनेक बाबतीत पुरुषांपेक्षा बलवान असतात. 

पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान

चाणक्यनीतीनुसार, आचार्य चाणक्य म्हणतात, महिला पुरुषांपेक्षा खूपच बुद्धिमान असतात. महिलांमध्ये परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता असते. ही गुणवत्ता पिढ्यानपिढ्या चालू राहते. जसजसे महिलांचे वय वाढते. हळूहळू ती शहाणी होऊ लागते.

भावनांवर नियंत्रण

आचार्य चाणक्य यांच्या धोरणानुसार, महिला पुरुषांपेक्षा त्यांच्या भावनांवर जास्त नियंत्रण ठेवतात. लोकांना वाटते की महिला जास्त भावनिक असतात, पण तसे नाही, उलट भावनिक असणे ही महिलांची ताकद आहे. ज्यामुळे महिला कोणत्याही समस्येत सहजासहजी हार मानत नाहीत.

जास्त भूक लागते

आचार्य चाणक्य यांच्या धोरणानुसार, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त भूक लागते. महिला पुरुषांपेक्षा जास्त खातात, हे त्यांच्या शरीराच्या रचनेमुळे होते. महिलांना पुरुषांपेक्षा जास्त कॅलरीजची आवश्यकता असते. ज्यामुळे महिला पुरुषांपेक्षा दुप्पट खातात.

पुरुषांपेक्षा जास्त धाडस

आचार्य चाणक्य यांच्या धोरणानुसार, महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त धैर्य असते. पुरुषांना वाटते की महिला कमकुवत आहेत पण तसे नाही. कोणतीही परिस्थिती आली, तेव्हा महिला पुरुषांपेक्षा 6 पट जास्त धाडसी असतात. ती कोणत्याही कठीण परिस्थितीत मागे हटत नाही. उलट, महिला आलेल्या परिस्थितीचा सामना करतात.

हेही वाचा :

Weekly Horoscope: 5 तारखेपासून सुरू होणारा 'मे' चा नवा आठवडा 'या' 4 राशीसाठी भाग्यशाली! धनलाभ, इच्छा होतील पूर्ण ! साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)