Chalis Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर (November) महिन्याची सुरुवात अनेक शुभ योगांनी होणार आहे. खरंतर, 31 ऑक्टोबर 2025 च्या संध्याकाळी 7 वाजून 43 मिनिटांनी वैदिक ज्योतिष शास्त्रातील दोन अत्यंत शुभ आणि तेजस्वी ग्रह बुध आणि शुक्र ग्रह एकमेकांत 40 अंशावर कोणाच्या स्थितीत आहेत. या स्थितीला संस्कृतमध्ये 'चालीस योग' म्हटलं जातं. हा योग जुळून आल्याने नोव्हेंबर महिन्यात काही राशी फार लकी ठरण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

बुध ग्रह बुद्धी, वाणी, तर्क, विश्लेषण आणि व्यवसायाचा कारक ग्रह मानला जातो. तर, शुक्र ग्रह प्रेम, कला, सौंदर्य, आकर्षणाचा कारक ग्रह आहे. जेव्हा हे दोन योग एकमेकांच्या समोरासमोर येतात तेव्हा राशींच्या आयुष्यात यश आणतात. सकारात्मक बदल घडवून आणतात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी हा योग फार शुभकारक ठरणार आहे. या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. जेव्हा बुध ग्रह मित्र ग्रह शुक्र ग्रहाबरोबर येऊन शक्तिशाली स्थितीत असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या वाणीने इतरांचं मन जिंकाल. तसेच, तुम्ही समजुतदारीने तुम्ही व्यवहार कराल. मार्केटिंगशी संबंधित लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल. 

Continues below advertisement

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ फार शुभ असणार आहे. मित्रांचा सहभाग तुम्हाला चांगला लाभेल. तसेच, या काळात तुमचे प्रवासाचे योग जुळून येणार आहे. करिअरला नवीन दिशा मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अनेक शुभवार्ता ऐकायला मिळतील. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी नोव्हेंबरचा महिना फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. जर तुम्हाला एखाद्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Horoscope Today 1 November 2025: नोव्हेंबरचा पहिलाच दिवस 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवांच्या कृपेने इच्छापूर्ती होईल, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा