Horoscope Today 31 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 1 नोव्हेंबर 2025, आजचा वार शनिवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिकृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज घाई धांदल धावपळ तुमच्या पाचवीलाच पुजलेली असल्यामुळे आजचा दिवस खूप गडबडीत जाईल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये तरुण वर्गाची येजा वाढेल, त्यामुळे घरातील वातावरण उत्साही राहील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज लोकांच्या नवीन कल्पनांचे स्वागत कराल, चाकोरी बाहेरील कल्पना साकारताना थोडा त्रास होईल परंतु विचारांती मान्यता द्याल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज व्यवसाय जुन्या पद्धतीने कामे करण्यास अवघड जात असल्यामुळे कामाची पद्धत बदलावी लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज नोकरीत वरिष्ठान समोर नवीन पर्याय ठेवाल, त्यामुळे कामाचा वेग वाढेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज कामाचं ताण फक्त घ्यायचा नाही, कष्टाला मात्र मर्यादा राहणार नाही
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांना मुलांची मते पटणार नाहीत. आज राग ताब्यात राहणार नाही
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज इस्टेटि संबंधी काही धाडसी निर्णय घेतले जातील. कामाची धडाडी दाखवली तर भरपूर फायदा मिळेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज कामातील अडथळे लीलया पार होतील, अचानक धनलाभाच्या दृष्टीने दिवस चांगला
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज कमी श्रमात भरपूर पैसा मिळण्याचा काळ आहे, स्त्रियांना मनाप्रमाणे निर्णय घेता येतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज उपासनेमध्ये प्रगती होईल, अध्यात्मिक दृष्ट्या शांती समाधान लाभेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना उत्तम संधी मिळतील, आईकडून विशेष सौख्य लाभेल.
हेही वाचा>>
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो नोव्हेंबरचा नवा आठवडा नशीब पालटणारा! कसा जाणार आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)