Chaitra Navratri 2024 Horoscope Today 16 April 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज, मंगळवार, 16 एप्रिल हा महत्त्वाचा दिवस आहे. आज चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) आठवा दिवस, ही तिथी अष्टमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी माता भगवतीची आठवी शक्ती महागौरीची पूजा केली जाते. आज दिवसभर पुष्य नक्षत्र राहील, तर दुपारी 3:00 ते 04:30 पर्यंत राहू काळ राहील, त्यानुसार सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा मंंगळवार नेमका कसा राहील ते जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आज तुम्हाला काही कामानिमित्त प्रवासाचा योग आहे. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. व्यवसायातील कोणताही नवीन व्यवहार तुम्ही भागीदारीत सुरू करू शकता. कुटुंबात शुभ कार्याची शक्यता राहील. आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात.


वृषभ रास (Taurus)


आज तुमचं एखादं रखडलेलं प्रलंबित काम पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही बिघाड जाणवेल. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. बायको आणि मुलांसोबत शॉपिंग आणि आऊटिंगला जाता येईल.


मिथुन रास (Gemini)


आजचा दिवस चढ-उताराचा असू शकतो. आज तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला कुटुंबाबाबत मोठा निर्णय घ्यावा लागेल. यामुळे तुमचं मनही उदास होईल. व्यवसायातील वाद चिघळू शकतात. तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. पत्नीशी मतभेद होतील.


कर्क रास (Cancer)


आज तुम्हाला आतून खूप चांगलं वाटेल, तुम्ही तुमच्या विरोधकांचा सामना करू शकाल. आज तुम्ही तुमचं काही जुनं काम स्वतः पूर्ण कराल. कुटुंबात शुभ कार्ये होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला व्यवसायात मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. आज तुम्ही एखादं वाहन वैगेरे खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता.


सिंह रास (Leo)


आजचा दिवस तुमच्यासाठी एखादी नवीन मोठी भेट घेऊन येऊ शकतो. कुटुंबात कुणाला प्रमोशन मिळू शकतं, त्यामुळे मन प्रसन्न राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वादापासून दूर राहा. तुम्हाला तुमच्या पत्नीच्या आरोग्याबाबत काही समस्या जाणवतील.


कन्या रास (Virgo)


आज तुम्ही एखाद्या व्यवसायात भागीदार होऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. तसेच आज एखादा जुना मित्र तुम्हाला भेटू शकतो, ज्याची भेट तुमच्या मनाला आनंद देणारी असेल. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्या पत्नीसोबत सुरू असलेले मतभेद आज मिटतील. मुलांच्या शिक्षणाची चिंता राहील.


तूळ रास (Libra)


आज तुमचं मन काहीसे अस्वस्थ राहू शकतं. आज तुम्हाला आरोग्याबाबत काही समस्या जाणवतील. आज तुम्ही कौटुंबिक वादात अडकू शकता, ज्यामुळे तुम्हाला अपमानित व्हावं लागेल. व्यवसायात घट होईल. मित्रांकडून आर्थिक मदत घ्यावी लागू शकते.


वृश्चिक रास (Scorpio)


आज काही कारणास्तव तुमचा मूड ऑफ असू शकतो. कुटुंबातील प्रिय व्यक्तीबद्दल दुःखद बातमी मिळेल. तसेच, व्यवसायात एखाद्यावर विश्वास ठेवणं आपल्यासाठी खूप हानिकारक असेल. आज कामाची जागा बदलू नका. पत्नीसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखला जाऊ शकतो.


धनु रास (Sagittarius)


आज तुमच्या मनात काही नवीन कामाची आयडिया येऊ शकते, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. आज तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. तसेच, कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. तुम्ही बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ शकता. पत्नी आणि मुलांची तब्येत तुम्हाला सतावेल.


मकर रास (Capricorn)


आज तुमचं काही महत्त्वाचं काम पूर्ण होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठा सन्मान मिळू शकेल. व्यवसायात एखाद्या मोठ्या व्यक्तीशी करार होऊ शकतो. तसेच, कोर्टातील जुन्या वादात तुम्हाला विजय मिळेल. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील.


कुंभ रास (Aquarius)


आज तुम्ही कामाच्या शोधात बाहेर कुठेतरी प्रवास करू शकता, आज तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्याबाबत शंका आहे. तुमच्या जुन्या व्यवसायात तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही कुटुंबातील कोणाला तरी गमावू शकता. पत्नी आणि मुलांचे आरोग्य बिघडू शकते.


मीन रास (Pisces)


आज तुम्ही एखाद्या खास व्यक्तीच्या संपर्कात येऊन मोठा नफा कमवू शकता. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्हाला मोठं पद मिळू शकतं, त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात आज तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. आज तुम्ही मालमत्तेत मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. आज तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांसाठी शॉपिंग देखील करू शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : आज सर्वार्थ सिद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; कुंभ राशीसह 'या' 5 राशींना होणार आर्थिक लाभ, करा 'हे' उपाय